तब्बल 32 वर्षांनंतर अखेर सलमानला 'ती' भेटलीच, त्यानं जे केलं ते पाहून....

अनेक वर्षांपूर्वी सलमान असाच लाजला होता...

Updated: Nov 11, 2021, 10:28 AM IST
तब्बल 32 वर्षांनंतर अखेर सलमानला 'ती' भेटलीच, त्यानं जे केलं ते पाहून.... title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सलमान खान कधी लग्न करणार इथपासून त्याचं पहिलं प्रेम कोण होतं इथपर्यंत अनेक प्रश्न चाहत्यांनी कायमच उपस्थित केले आहेत. पण, असं असताना सलमान मात्र या साऱ्यापासून दूर पळताना दिसला. सलमानला हक्काच्या व्यक्तीची साथ आता गरजेची आहे असं त्याच्या जवळच्या मित्रांनाही वाटतं. पण, आता भाईजान हे मनावर केव्हा घेणार हाच मोठा प्रश्न. 

तूर्तास आयुष्यभराच्या जोडीदाराचं ठाऊक नाही, पण नुकताच सलमान एका खास व्यक्तीसोबत दिसला. जवळपास 32 वर्षांनंतर सलमान या व्यक्तीसोबत दिसला आणि पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावरही नकळतच एक वेगळा आनंद पाहायला मिळाला. (Salman khan Bigg boss)

ही खास व्यक्ती म्हणजे सलमान खानच्या पहिल्या चित्रपटातील त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणारी आणि त्याला 'मैने प्यार किया' म्हणणारी अभिनेत्री भाग्यश्री. 

सलमान सूत्रसंचालन करत असणाऱ्या 'बिग बॉस 13' या रिअॅलिटी शोच्या मंचावर नुकतीच भाग्यश्रीनं हजेरी लावली होती. यावेळी या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या या चित्रपटातील आठवणी शेअर केल्या.

इतकंच नव्हे तर त्यानं मंचावरच सायकल चालवत चित्रपटातील सीन रिक्रिएट करण्याचाही एस सुरेख प्रयत्न केला. 

सलमान आणि भाग्यश्रीची केमिस्ट्री किती गोड आहे, हेच या क्षणांनी पुन्हा स्पष्ट केलं. 'तुम लडकी हो... मै लडका हूँ...' असं म्हणत सलमाननं यावेळी भाग्यश्रीसोबतच चाहत्यांचीही मनं जिंकली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

एक काळ गाजवणाऱ्या चित्रपटाच्या निमित्तानं ही जोडी पुन्हा प्रेक्षकांसमोर आली आणि 'अरे हे आजही किती गोड दिसतात', अशाच शब्दांत चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या.