Main Atal Hoon : आज भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची 98 वी जयंती आहे. देशभरात आज अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. आजच्या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना राष्ट्रपती, पतंप्रधान आणि अनेक बड्या नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. तर आजच्या दिवसाचे निमित्त साधून बॉलिवूडने गोड बातमी शेअर केली आहे. उत्कृष्ट अभिनेता पंकज त्रिपाठी याने त्यांच्या सोशल मीडियावरुन अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित एक सिनेमा पुढील वर्षी येणार असल्याचे सांगितले आहे.
अभिनेता पंकज त्रिपाठीला त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्तवाची कामगिरी बजावली आहे. बॉलीवूड असो वा ओटीटी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा विचार केला तर पंकज त्रिपाठी यांचे नाव पहिल्या स्थानावर येते. त्याच्या या अभिनयामुळेच जेव्हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचा विचार केला तेव्हा निर्मात्यांनी पंकज त्रिपाठी यांचा विचार केला. आज 25 डिसेंबर संपूर्ण देश माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करत आहे. यावेळी पंकज त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकमध्ये ते अटल बिहारी यांची भूमिका साकारणार आहेत.
अभिनेता पंकज त्रिपाठीने सोशल मीडियावर तो व्हिडिओ शेअर केला. कुठेही डगमगले नाही, कुठेही माझे डोके झुकले नाही, मी एक अनोखी शक्ती आहे, मी स्थिर आहे. पंकज त्रिपाठी यांनी पंडित धीरेंद्र त्रिपाठी यांच्या कवितेच्या काही ओळी लिहून आपली भावना व्यक्त केली. इतकंच नाही तर त्यांनी सांगितले की हे अनोखे व्यक्तिमत्व पडद्यावर व्यक्त करण्याची संधी मिळाली. मी आभारी आहे #MainAtalHoon.तसेच सांगितले की, ते या भूमिकेसाठी खूप उत्सुक आहे आणि हे पात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक पात्र आहे. अटलजींचे व्यक्तिमत्त्व पडद्यावर जिवंत करणे ही एका परीक्षेपेक्षा कमी नाही. मात्र या परीक्षेत त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, असा आमचा ठाम विश्वास आहे. #MainATALHoon लवकरच. असं पंकज त्रिपाठीने त्या पोस्ट मध्ये सांगितले आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांचा बायोपिक मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव दिग्दर्शित करत आहेत. चित्रपटाची कथा 'द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिक्स अँड पॅराडॉक्स' या पुस्तकावर आधारित असेल. हा चित्रपट पुढील वर्षी अटलबिहारी वाजपेयींच्या वाढदिवसाला म्हणजेच 25 डिसेंबर 2023 ला प्रदर्शित होणार आहे.