मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काली ( Kaali) या डॉक्युमेंट्री सिनेमाच्या पोस्टरचा वाद वाढताना दिसत आहे. निर्माती लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) हिच्या काली या डॉक्युमेंट्री सिनेमात काली माता सिगरेट ओढताना दाखवण्यात आली होती. डॉक्युमेंट्रीच्या पोस्टला अनेक स्तरातून विरोध होत असताना टीएमसीच्या नेत्या आणि खासदार महुआ मोइत्रा यांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. एवढंच नाही तर त्यांनी स्वतःच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देखील दिलं आहे.
काली सिनेमाच्या पोस्टरवर काय म्हणाल्या महुआ मोइत्रा?
'कालीचे अनेक रूप आहेत. 'माझ्यासाठी काली म्हणजे मांस आणि मद्याचा स्वीकारणारी देवी. यावर लोकांची स्वतःची वेगवेगळी मते आहेत, मला त्यावर हरकत नाही.' या वक्तव्यावर महुआ मोइत्रा यांनी स्पष्टीकरण दिल आहे.
To all you sanghis- lying will NOT make you better hindus.
I NEVER backed any film or poster or mentioned the word smoking.Suggest you visit my Maa Kali in Tarapith to see what food & drink is offered as bhog.
Joy Ma Tara— Mahua Moitra (@MahuaMoitra) July 5, 2022
'मी कधीही कोणत्याही सिनेमाचं किंवा पोस्टरचं समर्थन केलं नाही. मी धूम्रपान या शब्दाचा उल्लेख केला नाही. तुम्हाला सल्ला देते एकदा तारापीठ येथील कालीला भेट द्या. पाहा तिथे कोणते पदार्थ आणि पेय देवीला नैवैद्य म्हणून देतात... असं म्हणत त्यांनी संघावर टीका केली आहे.
महुआ मोइत्रा यांच्या वक्तव्यावर पक्षाची भूमिका
'पक्षाने सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, महुआ मोइत्रा यांनी देवी कालीवरील व्यक्त केलेलं मत त्यांचं वैयक्तिक आहे. अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस अशा टिप्पण्यांचं तीव्र निषेध करतो.' अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.
The comments made by @MahuaMoitra at the #IndiaTodayConclaveEast2022 and her views expressed on Goddess Kali have been made in her personal capacity and are NOT ENDORSED BY THE PARTY in ANY MANNER OR FORM.
All India Trinamool Congress strongly condemns such comments.
— All India Trinamool Congress (@AITCofficial) July 5, 2022
'काली' सिनेमाच्या आक्षेपार्ह पोस्टवर देशात विविध ठिकाणी FIR दाखल करण्यात आल्या. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मुंबईमध्ये हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्याचा आरोप करत FIR दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागला आहे.