बॉलिवूड अभिनेत्री Mahima Chaudhry च्या आईचं निधन!

Mahima Chaudhry's Mother Death : महिमा चौधरी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. महिमाच्या आईचं निधनानं तिला मोठा धक्का बसला आहे. फक्त तिलाच नाही तर तिच्या मुलीलाही धक्काबसला आहे. दरम्यान, लवकरच महिमा 'इमर्जन्सी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 17, 2023, 03:28 PM IST
बॉलिवूड अभिनेत्री Mahima Chaudhry च्या आईचं निधन! title=
(Photo Credit : Mahima Chaudhry Instagram)

Mahima Chaudhry's Mother Death : बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीवर (Mahima Chaudhry)  दु: खाचा डोंगर कोसळला आहे. महिमाच्या आईचं निधन झालं आहे. महिमा चौधरीच्या आईचं निधन तीन-चार दिवस आधी झाल्याचं म्हटलं जातं आहे. महिमा चौधरीच्या आईच्या निधनानंतर तिच्यासाठी आणि तिच्या मुलीसाठी हा खूप वाईट प्रसंग आहे. त्यांना या दु:खातून सावरण्यासाठी खूप हिंमत्तीची गरज आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिमाची आईही गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे म्हटले जाते. महिमा चौधरी आणि तिची लेक एरियाना या दोघींना त्यांच्या निधनानं मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे महिमा चौधरीच्या आयुष्यात हे नवीन दु: खाचं वादळ आलं आहे. (Mahima Chaudhry's Mother Passed Away) दरम्यान, महिमा चौधरीच्या आईविषयी आणखी काही माहिती समोर आलेली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

महिमा चौधरी गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. काही वर्षांपूर्वी महिमाला कॅन्सरचं निदानं झालं होतं. दरम्यान, महिमा चौधरीनं कर्करोगावर मात केली. तर त्यानंतर अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून महिमा चौधरीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत अनुपम खेर यांनी महिमा चौधरीच्या कर्करोगाची माहिती दिली असून तिनं त्यावर मात केल्याचे देखील सांगितले. 

महिमा चौधरीचा हा व्हिडीओ शेअर करत अनुपम यांनी कॅप्शन दिलं की 'मी एक महिन्या आधी महिमा चौधरीला फोन केला होता. तेव्हा मी यूएसमध्ये होतो. माझ्या 525 व्या चित्रपटामधील एका महत्त्वाच्या भूमिकेबाबत मला महिमासोबत चर्चा करायची होती. त्यानंतर आमचं बोलणं झालं. तेव्हा मला कळालं की, महिमाला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. तिची जगण्याची पद्धत आणि तिचा दृष्टिकोन जगभरातील महिलांना जीवन जगण्याची नवी प्रेरणा देऊ शकतो.' 

हेही वाचा : Madhurani Prabhulkar च्या 'त्या' व्हिडीओत आई-मुलीचं बॉन्ड पाहताच नेटकरी म्हणाले...

महिमा चौधरीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, महिमा चौधरीनं सगळ्यात आधी एका म्युझिक चॅनलमध्ये व्हीजे म्हणून काम केले होते. निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांनी महिमाला एकदिवस त्या चॅनेलवर पाहिले आणि तिला संधी दिली. त्यांनी महिमा चौधरीला 1997 साली प्रदर्शित झालेल्या ‘परदेस’ या चित्रपटात कास्ट केलं होतं. पण महिमाला खरी लोकप्रियता ही 1999 साली प्रदर्शित झालेल्या 'दिल क्या करे' या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात महिमा चौधरीनं शाहरुख खानसोबत काम केलं होतं. दरम्यान, 'इमर्जन्सी' या चित्रपटामधून ती बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.