Mahesh Bhatt : 'मी जगात नसलो तरी....' नातीच्या जन्मानंतर असं का म्हणू लागले महेश भट्ट?

'मी जेव्हा पहिल्यांदा राहाला पहिलं, तेव्हा मला लहानपणाची आलिया आठवली...' महेश भट्ट नातीला देणार खास भेट   

Updated: Dec 16, 2022, 03:43 PM IST
Mahesh Bhatt : 'मी जगात नसलो तरी....' नातीच्या जन्मानंतर असं का म्हणू लागले महेश भट्ट? title=

Mahesh Bhatt Dedicates Book to Raha :  अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) यांनी 14 एप्रिल रोजी लग्न केलं. लग्नाच्या 2 महिन्यांनंतर सोनोग्राफीचा एक फोटो पोस्ट करत आलियाने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी दिली. 6 नोव्हेंबर 2022 मध्ये आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर कपूर आणि भट्ट कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे. आलिया-रणबीरच्या लेकीचं नाव राहा असं आहे. प्रत्येक जण राहाची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत, तर दुसरीकडे दिग्दर्शक आणि आलियाचे वडील महेश भट्ट यांनी नातीबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. (ranbir kapoor and alia bhatt movies)

'मी जेव्हा पहिल्यांदा राहाला पहिलं, तेव्हा मला लहानपणाची आलिया आठवली...' असं महेश भट्ट म्हणाले. तर यावेळी महेश भट्ट यांनी राहाच्या खास गिफ्टबद्दल देखील सांगितलं. 6 डिसेंबरला राहा एक महिन्याची झाली. तेव्हा कपूर आणि भट्ट कुटुंब एकत्र येवून सेलिब्रेशन केलं. 

एका मुलाखतीत महेश भट्ट यांना राहाच्या खास गिफ्टबद्दल सांगितलं. महेश भट्ट यांचं तिसरं पुस्तक ‘द लास्ट चॅप्टर’ (The Last Chapter) लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘द लास्ट चॅप्टर’ पुस्तक ऑडिओ बुक स्वरूपातील असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे महेश भट्ट हे पुस्टक आलियाची मुलगी आणि नात राहाला डेडिकेट करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. (Latest Marathi News Bollywood)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

‘द लास्ट चॅप्टर’ पुस्तकातून  महेश भट्ट आतापर्यंत त्यांना आलेले अनुभव सांगणार आहेत. महेश भट्ट म्हणाले, 'आलियाची मुलगी आणि माझ्या नातीसाठी मी माझा आवाज मागे सोडून जाणार आहे. कारण मी या जगात नसलो तरी माझा आवाज कायम माझ्या मातीसोबत राहिल....' असं महेश भट्ट मुलाखतीत म्हणाले. (Bollywood Latest News)

महेश भट्ट सध्या ‘द लास्ट चॅप्टर’ पुस्तकावर काम करत आहेत. दरम्यान, नुकताच महेश भट्ट यांचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. महेश भट्ट यांच्या वाढदिवसाचे फोटो आलियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. (Mahesh Bhatt Dedicates Book The Last Chapter to Raha )