वडिलांच्या निधनानंतर Mahesh Babu ढसाढसा रडला, लेक म्हणाली "आजोबा, माझ्या चेहऱ्यावरचं हसू..."

Superstar Actor Krishna Death: महेश बाबू (Mahesh Babu) याचा मोठा भाऊ रमेश बाबूचं (Ramesh Babu) याच वर्षाच्या सुरूवातीला निधन झालं होतं. त्यानंतर आईने कुटुंबाची साथ सोडली होती. त्यानंतर आता...

Updated: Nov 17, 2022, 12:25 AM IST
वडिलांच्या निधनानंतर Mahesh Babu ढसाढसा रडला, लेक म्हणाली "आजोबा, माझ्या चेहऱ्यावरचं हसू..." title=
mahesh babu daughter sitara emotional post

Mahesh Babu Father Death: दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूचे वडील आणि सुपरस्टार कृष्णा गुरु (Krishna Guru) यांनी 15 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला.  हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. काही दिवसांपूर्वीच महेश बाबूच्या (Mahesh babu) आईचं निधन झालं होतं. त्यानंतर आता त्याच्या वडिलांचं देखील निधन (Superstar Actor Krishna Death) झाल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत.

महेश बाबू याचा मोठा भाऊ रमेश बाबूचं (Ramesh Babu) याच वर्षाच्या सुरूवातीला निधन झालं होतं. त्यानंतर आईने कुटुंबाची साथ सोडली होती. त्यानंतर आता वडिलांनी देवरस्ता धरल्याने महेश बाबूवर दुख:चा डोंगर पसरला आहे. आजोबांच्या निधनानंतर नातवांना देखील अश्रू अनावर झाले आहेत.

आजोबांच्या अंतिम दर्शनावेळी महेश बाबूची मुलगी सितारा ढसाढसा रडताना दिसली होती. त्यानंतर तिने आता इन्टाग्रामवर भावूक पोस्ट लिहिली आहे. सिताराची पोस्ट पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

पाहा पोस्ट - 

दरम्यान, आता विकेंडचं दुपारचं जेवण आधीसारखं नसेल. तुम्ही मला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत. माझ्या चेहऱ्यावर हसू कसं असेल हे तुम्ही कायम पाहिलंय. परंतु आता या गोष्टी फक्त आठवणी झाल्या आहेत. तुम्ही माझ्यासाठी हिरो होता. एक दिवस तुम्हाला माझा अभिमान वाटेल, असं काम मी करेन, असं सितारा (Mahesh Babu Daughter sitara) पोस्टमध्ये म्हणाली.