मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'ब्रम्हास्त्र' (Brahmastra) हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी चित्रपट बॉयकॉट (Brahmastra Boycott Trend)ट्रेंडमध्ये फसला तरी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. पण दुसरीकडे वेगळंच चित्र पाहायला मिळालं. हा चित्रपट काही प्रेक्षकांना प्रचंड आवडला तर काहींच्या पसंतीस हा चित्रपट उतरू शकला नाही असे सांगितले आहे. दरम्यान, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम पृथ्वीक प्रतापनं (Prithvik Pratap) एक व्हिडीओ शेअर करत त्याची खिल्ली उडवली आहे. (Prithvik Pratap Viral Video On Brahmastra)
पृथ्वीकनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून (Prithvik Pratap Instagramj Video) हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पृथ्वीक काळोखात उभा आहे आणि वेगवेगळ्या रंगाच्या छटांच्या लाईट आपल्याला पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओत ‘ब्रह्मास्त्रचा क्लायमेक्स पाहत आहे बाकी काहीच नाही असं लिहिलं आहे.' (Maharashtrachi Hasyajatra Fame Prithvik Pratap Share Video On Brahmastra Movie Ranbir Kapoor Alia Bhatt Amitabh Bachchan Nagarjuna Mouni Roy)
हा व्हिडीओ शेअर करत पृथ्वीकनं कॅप्शन दिलं की 'चित्रपटाचं नाव इंद्रधनुष्य ही चाललं असतं. पण मला हा चित्रपट आवडला आहे.' पृथ्वीकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. पृथ्वीकच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी मजेशीर कमेंट करत म्हणाला, 'सगळं डोक्यावरणं गेलंय बहुतेक.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आमच्याकडे गणपतीला अशीच लाइट होती.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'लेझर लाइट आहे की चित्रपटाचा क्लायमेक्स सीन पाहतोय.'
‘ब्रह्मास्त्र’ पाहिल्यानंतर अनेकांनी आलिया-रणबीर या जोडीचंही कौतुक केलं. या दोघांशिवाय चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि मौनी रॉय (Mouni Roy) देखील मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन (South Superstar Nagarjuna) देखील दिसत आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. तर उद्या म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी तुम्हाला हा चित्रपट 75 रुपयाला पाहायला मिळणार आहे.