'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरुण कदम यांच्या नातवाचे नाव आणि अर्थ, समुद्राच्या अर्थाची 20 नावे

Arun Kadam Grandchild Name And Meaning : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून हसविणारा अरुण कदम नुकतेच आजोबा झाले आहेत. बाळाला दिले अतिशय गोड नाव. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 30, 2023, 01:49 PM IST
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरुण कदम यांच्या नातवाचे नाव आणि अर्थ, समुद्राच्या अर्थाची 20 नावे  title=

Indian Baby Names on Ocean : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अरुण कदम म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके 'दादूस' सध्या आजोबांची भूमिका साकारत आहेत. ही भूमिका रिल लाईफमध्ये नसून रिअल लाईफमध्ये असल्यामुळे याचा आनंद काही औरच आहे. विनोदवीर अरुण कदम यांच्या घरी तान्हुल्याच आगमन झाले आहे. लेक सुकन्याने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. 

अरुण कदम यांच्या नातवाचा अतिशय थाटामाटात नामकरण सोहळा पार पडला. या सोहळ्याची खास थिम ठरवण्यातआली होती. एवढंच नव्हे तर बाळाला दिलेलं नाव आणि डेकोरेशन यामध्ये एक संधता होती. त्यामुळे सगळ्या गोष्टी फार जुळून आल्या होत्या. तुम्ही देखील खालील नावांवरून मुलांची नावे ठेऊ शकता. 

अरुण कदम यांच्या नातवाचे नाव 

अरुण कदम यांच्या लेकीने सुकन्याने बाळाचे नाव 'अथांग' असं ठेवलं आहे. 'अथांग' तीन अक्षरी हे नाव अतिशय खास आहे. या नावाचा अर्थ आहे सुमद्र, निळाशार समुद्र किनारा. या नावाचे अंकशास्त्रानुसार मुल्यांक 6 आहे. 

नावात दडलेत हे गुण

'अथांग' या नावामध्ये काही अर्थ दडलेले आहेत. जसे की, जबाबदार व्यक्ती, संरक्षण करणारा, पालनपोषण करणारा, प्रेमळ, स्थिर, प्रामाणिक, दयाळू आणि खास नाते निर्माण करणारा. 

समुद्राच्या अर्थाची मुलांची नावे 

अर्णब 
अर्णव 
अनव 
अविश 
दयासागर

(वाचा - हनुमान चालीसा वरून मुला-मुलींची नावे )

मुलांची नावे  

सागर
साहिल 
समीरण 
स्वर्णव 
वरेंद्र 

मुलांची नावे ज्याचा अर्थ अथांग समुद्र

ओशिन
समुद्र 
सुमद्रगुप्त 
नदीश 
वारीश 

मुलांची तीन अक्षरी नावे 

तरंत 
तारीश 
विद्यासागर 
झोएब