मुंबई : अस्खलित आगरी- कोळी (Agri Koli) भाषा बोलत, व्यासपीठावर येत प्रेक्षकांना निखळ आनंद देणारं एक नाव म्हणजे अरुण कदम (Arun Kadam) यांचं. अभिनय जगतासोबतच एक विनोदवीर म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कदम यांनी आपल्या कलेच्या बळावपर प्रेक्षकांना आपलंसं केलं. (Maharashtrachi hasya jatra fame actor comedian arun kadams daughter winning hearts with her looks and reels)
आता जणू कदम म्हणजे अनेकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग झाले आहेत. असा हा विनोदवीर त्याच्या विनोदी शैलीसोबतच आणखी एका काराणामुळे चर्चेत आहे. ते कारण म्हणजे इन्स्टाग्रावरील रील्स (Instagram Reels).
लेकिसोबत धमाकेदार रील्स करत अरुण कदम (Arun Kadam Daughter) गेल्या काही दिवसांपासून सर्वांच्या नजरा वळवत आहेत. आयुष्य सुंदर आहे आणि ते तितक्याच सुंदरपणे जगलं पाहिजे हेच कदम आणि त्यांची मुलगी सुकन्याचे रील्स पाहून जाणवत आहे.
कदम यांची लेक, सुकन्या (Sukanya) ही कोणा अभिनेत्रीलाही लाजवेल इतकी सुंदर. तिच्या इन्स्टाग्रावर एक नजर टाकल्यास, साडीवर तिचं विशेष प्रेम असल्याचं स्पष्ट होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार सुकन्या ग्राफिक्स डिझायनिंग (Graphics Designing) क्षेत्रात काम करते. काही दिवसांपूर्वीच तिची लग्नगाठ सागर पोवळे याच्यासोबत बांधली गेली. फक्त लेकच नव्हे, तर अरुण कदम त्यांच्या जावयासोबतची मैत्रीच्या नात्यात वावरावं इतकं मोकळेपणाने वावरताना दिसतात.
लेकिसोबतं त्यांचं नातं पाहून, मुली वडिलांच्या जवळ असतात, हे म्हणणं नकळतच पटतं. कदम आणि त्यांच्या लेकिला बऱ्याचदा त्यांच्या पत्नीचीही (arun kadam wife) मिळते. सोशल मीडियावर या कुटुंबाची धमाल, पाहत नेटकरी बराच काळ त्यांच्या प्रोफाईलवर वेळ घालवताना दिसतात.