VIDEO : महाकाल मंदिर परिसरात चप्पल घालून फिरणारे परिणीति चोप्रा-राघव चड्ढा ट्रोल

Parineeti Chopra and Raghav Chadha Trolled :  परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 28, 2023, 03:42 PM IST
VIDEO : महाकाल मंदिर परिसरात चप्पल घालून फिरणारे परिणीति चोप्रा-राघव चड्ढा ट्रोल title=
(Photo Credit : Social Media)

Parineeti Chopra and Raghav Chadha Trolled : बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि तिचा पती राघव चड्ढा हे दोघं लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर ते दोघं अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आले. नुकताच त्या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत परिणीती आणि राघव हे उज्जैनच्या महाकाल मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेचा विषय ठरले होते. आता परिणिती आणि राघव यांच्या या व्हिडीओतील एका वेगळ्याच गोष्टीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. व्हिडीओत परिणिती आणि राघव यांनी मंदिराच्या आवारात चप्पल घातल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरून सगळ्यांनी त्यांना ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळते. 

परिणिती आणि राघवचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. परिणिती आणि राघव या व्हिडीओत मंदिराच्या आवारात चप्पल घालून जात असल्याचे पाहायला मिळते. त्यांनी केलेली ही चूक खूप महागात पडली आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर फक्त त्या दोघांना नाही तर संपूर्ण मंदिर प्रशासनावर देखील नेटकऱ्यांनी टीका केली आहे. अनेक नेटकरी त्या व्हिडीओवर कमेंट करत अनेक नेटकरी बोलत आहेत की चप्पल घालून कोण मंदिरात जातं. दुसरा नेटकरी म्हणाला, दर्शनाच्या नियम हे सर्वसामान्य लोक आणि सेलिब्रिटींसाठी वेगळे आहेत का? तर तिसरा नेटकरी म्हणाला की 'चप्पल घालून कोण मंदिरात जातं.' तर काही नेटकऱ्यांनी भेदभावाविषयी देखील कमेंट करत म्हणाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : शाहरुख खानचा 'जवान' पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणाऱ्या चाहत्यांसाठी मिळणार भेट वस्तू!

परिणिती आणि राघव यांच्याविषयी बोलायचे झाले तर मे महिन्यात त्या दोघांचा साखरपुडा झाला. दिल्लीतल्या कपुरथळा इथल्या निवासस्थानी त्यांचा साखरपुडा पार पडला होता. तर पुढच्या महिन्यात 25 सप्टेंबर रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. तर त्या दोघांचा हा शाही लग्न सोहळा राजस्थानमध्ये पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर गुरुग्राममध्ये ते ग्रॅंड रिसेप्शन देण्यात येणार आहे. साखरपुड्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी हजेरी लावल्यानंतर आता त्यांच्या लग्नात कोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.