'तुम्हाला वडील म्हणायला लाज वाटते'; महाभारतात श्रीकृष्ण साकारलेल्या अभिनेत्याची खंत

Nitish Bharadwaj : नितीश भारद्वाज हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Mar 4, 2024, 12:18 PM IST
'तुम्हाला वडील म्हणायला लाज वाटते'; महाभारतात श्रीकृष्ण साकारलेल्या अभिनेत्याची खंत title=
(Photo Credit : Social Media)

Nitish Bharadwaj : बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत' मालिकेतील श्रीकृष्णची भूमिका साकारणारे अभिनेता नितीश भारद्वाज हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. जेव्हा नितीश आणि त्यांची पत्नी स्मिता भारद्वाज यांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे. तेव्हा पासून त्या दोघांचं खासगी आयुष्य हे चर्चेत आहे. नितीश यांनी पत्नीवर मेंटल टॉर्चर करण्याचा आरोप लगावला आहे. त्याशिवाय त्यांनी सांगितलं आहे की पत्नीसोबत सुरु असलेल्या या केसमुळे त्यांच्या मुलींना प्रचंड त्रास होतोय. 

नितीशनं टाइम्स नाऊला दिलेल्या एका मुलाखतीत पत्नीवर अनेक आरोप केलेत. त्यांनी सांगितलं की "ती खोटारडी आहे. ती माझ्या मुलांना देखील खोटं बोलते. माझी मुलं मला म्हणतात, बाबा, तुम्हाला बाबा म्हणायला आम्हाला लाज वाटते. जेव्हा मी भेटायला गेलो तेव्हा आमची फक्त पाच मिनिटांची भेट झाली आणि मग माझी मुलगी तिथून उठली आणि मला बाहेर जाण्याचा इशारा देत दरवाजा दाखवू लागली."

नितीश म्हणाले की 'जर मी स्मिताला सांगितलं की मुलं आणि पैसे दोन्ही ठेवं तर ती लगेच घटस्फोट देईल. मात्र, मी माझ्या मुलांसाठी लढतोय. माझी मुलं तिच्यासारखे असावे अशी माझी मुळीच इच्छा नाही.' 

नितीश यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारित त्यांच्या पत्नी आयएएस स्मिता भारद्वाज यांच्या विरोधात मानसिक छळाचे आरोप केले आहेत. भोपाळ पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या या सगळ्या प्रकरणानंतर त्यांच्या चाहत्यांना त्यांची चिंता वाटू लागली आहे.

हेही वाचा : आराध्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी अवाक्! म्हणाले, '90 च्या दशकातील ऐश्वर्याच आठवली'

नितीश आणि स्मिता यांनी 2009 मध्ये लग्न केलं होतं. स्मिता या 1992 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी होत्या. मध्यप्रदेश कॅडरमधील त्या अधिकारी आहेत. त्यांना जुळ्या मुली देखील आहेत. लग्नाची 10 वर्ष दोघांनी सुखी संसार केल्यानंतर सतत होणाऱ्या वादाला पाहता विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दिला. त्यांचा हा खटला कौटुंबिक न्यायालयातही दाखल झाला. जिथे हे प्रकरण प्रलंबित आहे. स्मिताच्या आधी नितीश यांनी 1991 मध्ये मोनिषा पाटीलशी लग्न केलं होतं. 2005 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. दरम्यान, नितीश यांच्या तक्रारीनंतर पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत.