मुंबई : जेव्हा मुलं काही चांगलं काम करतात तेव्हा त्यांच्या पालकांना सर्वात जास्त आनंद होतो. बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री माधुरी दीक्षितलाही यावेळी तिचा मुलगा रियानचा अभिमान वाटतोय. माधुरीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिचा मुलगा रायनचा आहे, जो कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी आपले केस दान करत आहे. हा व्हिडीओ शेअर करत माधुरीने आपल्या मुलाचं हिरो असं वर्णन केलं आहे.
व्हिडिओ शेअर करत माधुरीने लिहिलं की, "सगळे नायक 'Capes' घालत नाहीत... पण माझ्या हिरोने केलं, मला राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त काहीतरी खास शेअर करायचं आहे," माधुरीने तिच्या मुलाचं कौतुक करत लिहिलं की, रायनला खूप वाईट वाटलं. त्यांचे काही सहकारी जे कर्करोगाशी आणि केमोथेरपीशी झुंज देत आहेत. त्या लोकांनाही केस गळण्याचं खूप दुःख झालं. माझ्या मुलाने भूमिका घेतली आणि त्याच्या चाइल्ड कॅन्सर सोसायटीला देणगी देण्याचा निर्णय घेतला, पालक म्हणून आम्ही त्याच्या निर्णयाने थक्क झालो.
हा व्हिडिओ शेअर करत माधुरीने वक्तव्य केलं की, त्याच्या मुलाने कॅन्सरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी दोन वर्षांपासून केस कापले नाहीत. तिने लिहिलं की, “मार्गदर्शक तत्त्वांनुसार, त्या लांबीपर्यंत केस वाढवण्यासाठी रायनला 2 वर्षे लागतील आणि ही शेवटची पायरी होती. आज आम्हाला खूप अभिमान वाटतोय.” यासोबतच माधुरीने हा व्हिडिओ तिच्या पतीलाही टॅग केला आहे. माधुरीने शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल होत असून यानंतर रायनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.