Madhuri Dixit च्या मुलाकडून कॅन्सर रुग्णांसाठी मोठी गोष्ट

मुलाचा व्हिडिओ शेअर करताना माधुरीने एक हृदयस्पर्शी भावनात्मक पोस्ट ही लिहिली आहे

Updated: Nov 8, 2021, 01:25 PM IST
Madhuri Dixit च्या मुलाकडून कॅन्सर रुग्णांसाठी मोठी गोष्ट  title=

मुंबई : राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा धाकटा मुलगा रायन याने आपले केस कर्करोगग्रस्तांना दान केले आहेत. आई माधुरी दीक्षितने 7 ऑक्टोबर रोजी तिच्या सोशल मीडिया हँडलवर मुलगा रायनचा व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली. व्हिडिओमध्ये, अभिनेत्रीचा मुलगा कर्करोगाच्या रुग्णांना दान करण्यासाठी त्याचे लांब केस कापताना दिसत आहे. माधुरीच्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 माधुरीच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल

मुलाचा व्हिडिओ शेअर करताना माधुरीने एक हृदयस्पर्शी भावनात्मक पोस्ट ही लिहिली आहे. माधुरीने नोटमध्ये सांगितले की, तिचा मुलगा रायनला कॅन्सरसाठी केमोथेरपी घेत असलेल्या लोकांना पाहून खूप वाईट वाटते. त्यामुळे कॅन्सर सोसायटीला देणगी देण्यासाठी तिच्या मुलाने केस दान दिले. माधुरीने सांगितले की, तिच्या मुलाला इतके लांब केस वाढायला जवळपास 2 वर्षे लागली.

माधुरीची भावनिक पोस्ट  

माधुरीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले - सर्व हिरो कॅप घालत नाहीत, परंतु माझ्या हिरोने घातली. राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त मला एक खास गोष्ट सांगायची आहे. कॅन्सरसाठी अनेक लोकांना केमोद्वारे जात असल्याचे पाहून रायनचे मन दुखले आहे. त्यांचे केस गळून पडतात. माझ्या मुलाने त्याचे केस कॅन्सर सोसायटीला दान करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निर्णयाने आम्ही पालक म्हणून खूप आनंदी आहोत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केसांची ही लांबी वाढण्यासाठी त्यांना सुमारे 2 वर्षे लागली आणि ही अंतिम पायरी होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

शिल्पा-फराहकडून रायनचे कौतुक 

माधुरी दीक्षितचा मुलगा रियानच्या या निर्णयाचे खूप कौतुक होत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कमेंट सेक्शनमध्ये त्यांची प्रशंसा करत आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही तिची प्रतिक्रिया दिली आहे. शिल्पाने कमेंट केली - खूप सुंदर कल्पना. फराह खाननेही माधुरीच्या व्हिडिओवर कमेंट करत रायनचे कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले - हे किती संवेदनशील आणि दयाळू आहे.