मुंबई : अभिनेत्री माधुरी दीक्षित आता निर्माती म्हणून ओळखली जाऊ लागली. '15 ऑगस्ट' या पहिल्या मराठी सिनेमानंतर दुसरा नवाकोरा सिनेमा 'पंचक' घेऊन माधुरी दीक्षित घेऊन येत आहे. माधुरी दुसरा सिनेमा तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत घेऊन येत आहे.
माधुरीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याची घोषणा केली आहे. 'पंचक' या सिनेमाचं शुटिंग सुरू झालं आहे. अंधश्रद्धेबाबत जागरूकता निर्माण करणारा विनोदी असा सिनेमा आहे. हा सिनेमा संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येणार आहे. इंस्टाग्रामवर माधुरीने संपूर्ण टीमचा फोटो देखील शेअर केला आहे.
माधुरीने दोन फोटो शेअर केला आहे. एका फोटोत डॉ नेनेंसोबत सिनेमाच्या मुहुर्ताचा फोटो शेअर केला आहे. तर दुसऱ्या फोटोत सिनेमाच्या क्रूसोबत फोटो शेअर केला आहे.
महत्वाची बाब म्हणजे या फोटोत अभिनेता आदिनाथ कोठारे देखील दिसत आहे. '15 ऑगस्ट' सिनेमात देखील आदिनाथ कोठारे प्रमुख भूमिकेत होता आणि या सिनेमात देखील तसेच चित्र दिसणार आहे.