माधुरी 'या' बॉलिवूड दिवासोबत घालणार 'पिंगा'

सौंदर्य आणि नृत्य यांचा अनोखा संगम म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षीत.

Updated: Sep 23, 2019, 02:41 PM IST
माधुरी 'या' बॉलिवूड दिवासोबत घालणार 'पिंगा' title=

मुंबई : सौंदर्य आणि नृत्य यांचा अनोखा संगम म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षीत. तिच्या नृत्य अदा कायम चाहत्यांना घायाळ करत असतात. आता ही नृत्यांगना अभिनेत्री प्रियांका चोप्रासह 'पिंगा गं...' या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. बॉलिवूड नंतर हॉलिवूडमध्ये मार्गक्रमण करणारी 'देसी गर्ल' पुन्हा बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. सध्या ती तिच्या आगामी 'द स्काय इज पिंक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

एका डान्स रियालिटी शोमध्ये प्रियंका तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी उपस्थित राहणार आहे. 'डान्स के दिवाने' शोमध्ये या दोन तारका त्यांचे नृत्य प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 

कथेनुसार चित्रपटाचे शूटिंग मुंबई, दिल्ली, लंडन आणि अंदमानमध्ये करण्यात आले आहे. जूही चतुर्वेदीने चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत आणि प्रीतम चक्रवर्तींनी चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटाची निर्मिती रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी केली आहे. 

या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम देखील झळकणार आहेत. 'द स्काय इज पिंक' चित्रपट ११ ऑक्टोबरमध्ये रूपेरी पडद्यावर होणार आहे.