मुंबईः शाहरूख खानला किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखलं जातं मात्र खऱ्या आयुष्यातील त्याची स्टोरी फार वेगळी आहे. गौरीचा होकार मिळवण्यासाठी शाहरूख खानला मात्र बरीच मेहनत घ्यावी लागलीय
शाहरूख आणि गौरी हे गोल्डन कपल पहिल्यांदा 1984 मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत भेटले. या पार्टीत शाहरुखने गौरीला दुसऱ्या मुलासोबत डान्स करताना पाहिलं त्यानंतर गौरीला डान्ससाठी विचारण्याची शाहरुखची हिंमत झाली नाही.
मात्र शाहरुखने त्याच्या मित्राला विचारले ती मुलगी कोण आहे? तेव्हा मित्राने शाहरूख आणि गौरीची ओळख करून दिली. त्यानंतर शाहरूखने गौरीला डान्ससाठी विचारलं तेव्हा गौरीने आपण आपल्या बॉयफ्रेंडची वाट पाहात असल्याचं सांगितलं.
एका मुलाखतीत गौरी खानबद्दल बोलताना शाहरुखने सांगितलं की, त्या पार्टीत गौरी माझ्याशी खोटे बोलली की ती बॉयफ्रेंडची वाट पाहात आहे, माझ्यासोबत डान्स करावा लागू नये म्हणून गौरी खोटं बोलली. गौरी तिथे बॉयफ्रेंडची नाही तर भावाची वाट पाहत होती.
गौरी शाहरुखचं पहिलं प्रेम होतं, तो गौरीबद्दल खूप सकारात्मक होता. गौरीचं इतर मुलांशी बोललेलंही शाहरूखला आवडत नसे. जेव्हा शाहरुख खानने गौरीला पहिल्यांदा प्रपोज केलं तेव्हा गौरीने त्याला नकार दिला, कारण गौरीच्या पालकांनाही शाहरुख आवडत नव्हता.
प्रिती झिंटाच्या चॅट शोमध्ये, शाहरुख खानने सांगितले मुंबईतल त्याने गौरीला लग्नासाठी प्रपोज केले आणि गौरीने पुन्हा एकदा त्याचं प्रपोज फेटाळलं. शाहरुख खानने प्रिती झिंटाला दिलेल्या मुलाखतीत पुढे सांगितले की, 'माझ्या आईचे एका वर्षानंतर निधन झाले, तेव्हा गौरीला माझ्यासाठी खूप वाईट वाटले. मग गौरीने लग्नासाठी होकार दिला आणि म्हणाली लग्न करूया..
गौरीला मी अभिनेता व्हावं असं वाटत नव्हतं. माझ्या दिग्दर्शकांनी मला लग्न न करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, 'बॅचलर हिरोची फॅन फॉलोइंग जास्त आहे', पण मी म्हटलं, खूप मेहनतीने गौरीला लग्नासाठी तयार केलंय आता लग्न करावं लागेल. मात्र, या सगळ्यानंतर गौरी आणि शाहरुख खानने 25 ऑक्टोबर 1991 रोजी लग्न केले.
दोघेही यावर्षी त्यांच्या लग्नाचा 31 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. गौरी आणि शाहरुखला आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुलं आहेत.