हुबेहुब रानू मंडल सारख्या दिसणाऱ्या महिलेची सोशल मीडियावर चर्चा

रानू मंडलसोबत महिलेची तुलना 

Updated: Nov 25, 2019, 09:08 AM IST
हुबेहुब रानू मंडल सारख्या दिसणाऱ्या महिलेची सोशल मीडियावर चर्चा  title=

मुंबई : गायक हिमेश रेशमियासोबत 'तेरी मेरी कहानी' गाणं गाऊन लोकप्रिय झालेली रानू मंडल सध्या खूप चर्चेत आहे. तिच्यासंबंधीत सगळ्याच गोष्टीवर प्रेक्षकांची नजर आहे. मग तिचा मेकओव्हर असो वा तिची गाणी. हिमेश रेशमियासोबत गाणं गाऊन रानू मंडल प्रकाशझोतात आली आहे. असं असताना हुबेहुब तिच्यासारख्या दिसणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

रानू मंडलप्रमाणे दिसणाऱ्या महिलेच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महत्वाचं म्हणजे या व्हिडिओत तिने रानू मंडलचंच गाणं गायलं आहे. रानूसारखीच दिसणाऱ्या या महिलेचा आवाज मात्र सुरेला नाही. तरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#RanuMondal 2.0 in (Maligaon)Guwahati. #Special Thanks to my friend Tanmoy Dey for shooting and Sharing this vdo. Vdo Rights :- Tanmoy dey #ranumondal #himeshreshammiya

A post shared by Dipankar Baishya (@chiragdipofficial) on

हा व्हिडिओ chiragdipofficial नावाच्या इंस्टाग्राम हँडलवरून आपल्या पेजवरून अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शननुसार ही महिला रानू मंडलसारखी दिसत असून ती गुवाहाटीत राहणारी आहे. व्हायरल झाल्यानंतर या महिलेला 'रानू मंडल 2.0' असं संबोधत आहेत. (हे पण वाचा - रानू मंडलचा 'मेकओव्हर'; सोशल मीडियावर चर्चा

काही दिवसांपूर्वी रानू मंडलच्या मेकओव्हरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.यानंतर तिच्यावर टीका देखील करण्यात आली. तसेच तिचा मेकओव्हर करणाऱ्या संध्या या मेकअप आर्टिस्टला देखील ट्रोल करण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ब्युटी पार्लरचं उद्घाटन रानू मंडलच्या हस्ते करण्यात आलं होतं. रानू मंडलने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच गाणं गाऊन लोकप्रियता मिळवली. त्यानंतर हिमेश रेशमियाने दिलेला ब्रेक महत्वाचा ठरला. 

रानू मंडल फक्त गाण्यांमुळेच नाही तर तिच्या ऍटिट्युडमुळे देखील चर्चेत आली होती. रानू मंडलचे असे देखील व्हिडिओ व्हायरल झाले होते ज्यामध्ये तिने तिच्या चाहत्यांशी चुकीची वागणूक केली होती. यामुळे रानू मंडलला यश डोक्यात गेलं का? असा देखील प्रश्न विचारला जात होता.