चिमुकली आराध्या बच्चन झाली मोठी; बदलेला लूक पाहून चाहत्यांना बसतोय धक्का

आराध्या कुठेही घरा बाहेर पडली की, ती पापाराझींच्या कॅमेरात होतेच. मात्र आराध्याच्या फॅनपेजवर तिचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. जे चांगलेच व्हायरल होत आहेत. 

Updated: Nov 18, 2023, 03:32 PM IST
चिमुकली आराध्या बच्चन झाली मोठी; बदलेला लूक पाहून चाहत्यांना बसतोय धक्का title=

मुंबई : अभिनेत्री आणि अभिनेत्यांप्रमाणे कायमच स्टारकिड्सदेखील कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यातलीच एक म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनची लेक आराध्या बच्चन. आराध्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आराध्या पापाराझींच्या कॅमेरात कैद होताच तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागतात. नुकताच आराध्याचा वाढदिवस मोठ्या थाटा-माटात पार पडला. सोशल मीडियावर चर्चेत असणारी आराध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आणि यामागचं कारण आहे तिचा बदलेला लूक. जो पाहून चाहते चांगलेच हैराण झाले आहेत. चिमुकली आराध्या किती लवकर मोठी झाली हे या समोर आलेल्या फोटोवरुन आपण म्हणू शकतो. 

आराध्या कुठेही घरा बाहेर पडली की, ती पापाराझींच्या कॅमेरात होतेच. मात्र आराध्याच्या फॅनपेजवर तिचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. जे चांगलेच व्हायरल होत आहेत. समोर आलेल्या फोटोत आराध्या तिची आई ऐश्वर्यासोबत दिसत आहे. या फोटोत तिने डेनिम जॅकेट परिधान केलं आहे. यासोबतच तिने पिंक कलकरच्या टॉपसोबत डेनिम जॅकेट परिधान केलं आहे. तर आई ऐश्वर्याने काळ्या रंगाचा ब्लेजर ड्रेस परिधान केला आहे. या दोघींचा एअरपोर्ट लूक चांगलाच चर्चेत आहे. तर आराध्या या फोटोत ऐश्वर्याच्या उंचीपर्यंत पोहचल्याचं पाहून मात्र तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आराध्या बच्चनही ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची एकुलती एक लाडकी मुलगी आहे. आराध्या बच्चन ही आपल्या क्युटनेसनं चाहत्यांची मनं जिंकून घेते आणि सोबतच तिची अनेकदा चर्चाही रंगलेली असते. अनेकदा सोशल मीडियावरून तिला ट्रोलही करण्यात येतं. अनेकदा तिला तिच्या हेअर स्टाईलवरुन ट्रोल करण्यात येतं.  तर कधी तिला आराध्या एवढी 12 वर्षांची झाली तरीही आईचा हात का पकडून चालते यामुळे तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. आराध्याचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. 

आराध्या ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. जिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक आहेत. अनेकदा आराध्या आई ऐश्वर्यासोबत स्पॉट होते. आई आणि मुलगी दररोज विमानतळावर एकत्र स्पॉट होतात. नुकताच आराध्याने तिचा १३ वा वाढदिवस तिच्या फॅमेलीसोबत साजरा केला.