लंडन : वूमन ओरीएंडेट चित्रपटांचा ट्रेंड चालू असताना 'लिपस्टिक अंडर माय बुर्खा' या महिला प्रधान चित्रपटाने लंडनमध्ये महत्त्वपूर्ण पुरस्कार प्राप्त केला.
'टीवीई ग्लोबल सस्टैनेबिलिटी फिल्म अवॉर्ड्स' मध्ये हा चित्रपट अव्वल ठरला. 'द फाउंडर्स अवार्ड्स ऑन सस्टैनेबिलिटी ऑन द बिग स्क्रीन' या पुरस्काराची सुरुवात याच वर्षी झाली असून सामाजिक कार्यकर्ता सुरीना नरुला यांनी याचे आयोजन केले आहे. यात लिपस्टिक अंडर माय बुर्खा या चित्रपटाने बाजी मारली आहे.
या पुरस्काराच्या ज्युरी पदावर आयमॅक्स थियटरचे मालिक, बीएफसी मीडिया लिमिटेडचे डिरेक्टर रिचर्ड क्रीसी, टेलीग्राफ मीडिया ग्रुप आणि ब्रिटेनचे मनोरंजन डिरेक्टर डेनिस पार्किंसन आणि सुरीना नरुला सहभागी होते.
पॅनलचे अध्यक्षत्व पुरस्कार प्राप्त सिनेमेटोग्राफर, डिरेक्टर आणि पटकथा लेखक स्टीवन बर्नस्टीन यांनी निभावले. लिपस्टिक अंडर माई बुर्खा ची निर्मिती प्रकाश झा यांनी केली असून दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव यांनी केले आहे. कोंकणा सेन शर्मा आणि रत्ना पाठक शाह यांनी या चित्रपटात महत्त्वपुर्ण भुमिका निभावल्या आहेत.