विराट कोहलीप्रमाणे ही अभिनेत्री देखील पिते ३ हजार रूपये लीटरचं पाणी...म्हणे आरोग्याला फायदा

अनेक सेलिब्रिटी 'ब्लॅक वॉटर' पित असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर कसाला परिणाम होत नाही. 

Updated: Apr 24, 2021, 04:35 PM IST
विराट कोहलीप्रमाणे ही अभिनेत्री देखील पिते ३ हजार रूपये लीटरचं पाणी...म्हणे आरोग्याला फायदा title=

मुंबई :  अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा समावेश आता प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत झाला आहे. उर्वशी फक्त तिच्या अभिनयामुळेच चर्चेत नसते, तर डान्स, आणि ग्लॅमरस लूकमुळे ती कायमच चर्चेत असते. पण आता मात्र ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्वशी नुकताच विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा तिच्या हातात असलेल्या पाण्याच्या बाटलीमुळे उर्वशी चर्चेत आली आहे. या पाण्याचं नाव 'ब्लॅक वॉटर' असं आहे. महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली देखील 'ब्लॅक वॉटर' पाण्याचं सेवन करतो.

उर्वशी आणि विराट शिवाय अनेक सेलिब्रिटी 'ब्लॅक वॉटर' पाण्याचं सेवन करतो.  'ब्लॅक वॉटर' पाण्याचे फायदे ऐकले तर तुम्ही थक्क व्हाल. या पाण्यासाठी प्रति लिटर तीन ते चार हजार रुपये मोजावे लागतात. 'ब्लॅक वॉटर'  रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते. त्यामुळे कोरोना काळात हे पाणी सेलिब्रिटींसाठी नक्कीचं फायद्याचं ठरत असेल.पण काही सेलिब्रिटी हे पाणी कायम पितात.

अनेक सेलिब्रिटी 'ब्लॅक वॉटर' पित असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर कसाला परिणाम होत नाही. हे पाणी फ्लूविक ट्रेसने इनफ्यूज केले जाते. Alkaline Water Infused With Fulvic Trace या पाण्याचा रंग काळा आहे. पाण्यात अनेक प्रकारचे मिनरल्स वापरले जात असावे. असं म्हटलं जातं.

उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, उर्वशी लवकरचं तामिळ चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाच्या नावाबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाचे बजेट २०० कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. हा बिग बजेट चित्रपट तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.