Leo Box Office Collection Day 1 : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता थलपती विजय हा सध्या चर्चेत आहे. तो चर्चेत असण्याचं कारण त्याचा चित्रपट लियो ठरला आहे. लियो हा चित्रपट काल म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला ट्विटरवर संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही लोकांना हा चित्रपट प्रचंड आवडला तर काहींना हा चित्रपट आवडला नाही. आता चर्चा सुरु आहे या चित्रपटाच्या कलेक्शनची. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी खूप चांगली कमाई केली आहे. या चित्रपटातून थलपती विजयनं शाहरुखला देखील बॉक्स ऑफिसवर मागे टाकले आहे.
बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं खूप चांगली कमाई केली आहे. सैकनिल्कच्या अर्ली मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटानं पहिल्याच दिवशी 63 कोटींची कमाई केली आहे. या शिवाय चित्रपटानं एकूण कमाई केली 74 कोटींची केली आहे. या चित्रपटानं तमिळ भाषेत 30 कोटी, केरळ भाषेत 11 कोटी आणि कन्नड भाषेत 14 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आंध्र प्रदेश/ तेलंगनामध्ये या चित्रपटानं 15 कोटींची कमाई केली. याशिवाय वर्ल्डवाइड कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 140 कोटींचा गल्ला केला. दरम्यान, हे अर्ली मीडिया रिपोर्ट्स आहेत.
हेही वाचा : 'मुन्नी' खरंच बदनाम झाली; मलायकाचा विचित्र लूक पाहून नेटकरी म्हणतात, 'ती उर्फी बरी'
निर्मात्यांसाठी काल एक वाईट बातमी समोर आली होती. चित्रपट समिक्षक मनोबाल विजयबालन यांनी ट्वीट करत या गोष्टीला कन्फर्म केलं आहे की लियो हा पायरसीचा शिकार झाला आहे. इतकंच नाही तर हा चित्रपट हाय क्वालीटीमध्ये लीक झाला आहे. मनोबाला विजयबालन यांनी ट्वीटमध्ये हे देखील स्पष्ट केलं की पायरेटेडे साईट्सवर चित्रपटाचा थिएटर व्हर्जन नाही तर हाय क्वालिटी व्हर्जन लीक झाला होता. हा चित्रपट लीक झाल्यानं त्याचा परिणाम हा चित्रपटाच्या कलेक्शनवर होऊ शकतो.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लियोनं पहिल्याच दिवशी 63 कोटी रुपयांची कमाई करत नवा इतिहास रचला आहे. तर टॉप 6 ओपनिंग डे कलेक्शनची चर्चा करायचं म्हटले तर त्यात लियोचे देखील स्थान आहे.
जवान: 75 कोटी रुपये
लियो: 63 कोटी रुपये (अर्ली मीडिया रिपोर्ट)
पठाण: 57 कोटी रुपये
केजीएफ चॅप्टर 2: 53.95 कोटी रुपये
वॉर : 53.35 करोड़ रुपये
ठग्स ऑफ हिन्दोस्तान: 52.25 कोटी रुपये (डेटा सोर्स: बॉलिवूड हंगामा)