‘लस्ट स्टोरीज’ च्या Adult Scene साठी लता दीदींचं गाणं पाहून संतापलेलं मंगेशकर कुटुंब

Kiara Advani- Karan Johar : कियारा अडवाणी आणि करण जोहरच्या 'लस्ट स्टोरी'मध्ये दाखवण्यात आलेल्या एका अडल्ट सीनवर लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी विरोध दर्शवला होता. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 11, 2023, 02:10 PM IST
‘लस्ट स्टोरीज’ च्या Adult Scene साठी लता दीदींचं गाणं पाहून संतापलेलं मंगेशकर कुटुंब title=
(Photo Credit : Social Media)

Kiara Advani- Karan Johar : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ही सध्या तिच्या सत्यप्रेम की कथा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला मिळालेल्या यशानं कियाराचे चाहते तिची आणि अभिनेता कार्तिकची चांगलीच स्तुती करत आहेत. कियारा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे लाखो चाहते आहेत. दरम्यान, एक वेळ अशी होती जेव्हा कियाराचा चांगलाच विरोध करण्यात आला होता. हा चित्रपट म्हणजे बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरचा 'लस्ट स्टोरीज'. या चित्रपटात कियाराचा एक सीन होता. ज्यामुळे कियारा आणि करण या दोघांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. त्याच कारण म्हणजे, एका सीनच्या बॅकग्राऊंडला 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील टायटल ट्रॅक ऐकायला येतो. लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं हे एका एडल्ड सीनच्या बॅकग्राऊंडला वापरल्यानं त्यांच्या कुटुंबानं त्या दोघांविरोधत तक्रार दाखल केली होती. 

लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील लोक हे लस्ट स्टोरीज या चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शकांवर संतापले होते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील एका सदस्यान नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बाजूनं सांगण्यात आलं होतं की "लता दीदींच्या अजर आणि अमर गाण्याचा वापर हा अशा प्रकारच्या विचित्र परिस्थितीसाठी का करण्यात आला? मला अजूनही आठवण आहे की करण जोहरला किती आनंद झाला होता जेव्हा लता दीदींनी कभू खुशी कभी गम या चित्रपटातील एका गाण्याचं रेकॉर्डिंग केलं होतं. त्यांनी सांगितलं होत की त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. तर आता असं काय झालं की त्याचं हे स्वप्न भयानक स्वप्न झालं?"

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : वीणा जगतापचं मेट्रोमोनियल साईटवर फेक अकाऊंट पोस्ट शेअर करत म्हणाली, "त्या व्यक्तीच्या..."

लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील सदस्याचं म्हणणं होतं की लता मंगेशकर यांना याविषयी कोणतीही माहिती नव्हती की त्यांच्या गाण्याचा वापर अशा प्रकारच्या विचित्र परिस्थितीत करण्यात येणार आहे. त्यांनी सांगितलं की या वयात आम्हाला त्यांना असं काही सांगायचं नाही आहे की त्यांच्या गाण्याचा वापर अशा प्रकारच्या विचित्र परिस्थितीत करण्यात आला आहे. पण आम्हाला आश्चर्य होत आहे की करण जोहरनं त्याच्या अभिनेत्रीच्या ऑर्गॅज्म दाखवत असलेल्या परिस्थितीसाठी वापरलं आहे. तुम्हाला आठवत नसेल तर लस्ट स्टोरीज या चित्रपटात कियारानं मेघा नावाच्या एका शिक्षेकीची भूमिका साकारली होती. तिचं लग्न विक्की कौशल म्हणजेच 'पारस'शी झालं होतं. पारस हे एक असं पात्र जे पत्नीला 'सेक्शुअल प्लेजर' देण्यात अपयशी ठरतं. त्यामुळे त्याच्या पत्नीच्या भूमिकेत असणारी कियारा व्हायब्रेटरचा वापर करण्याचा निर्णय घेते असं या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं होतं.