लता मंगेशकर यांनी बाथरुममध्ये रेकॉर्ड केलेलं 'हे' गाणं; शूटसाठी आला तब्बल 1 कोटींचा खर्च

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याच्या शूटसाठी तब्बल आला होता 1 कोटींचा खर्च... 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाविषयी न ऐकलेल्या गोष्टी... 

दिक्षा पाटील | Updated: Jun 15, 2024, 01:09 PM IST
लता मंगेशकर यांनी बाथरुममध्ये रेकॉर्ड केलेलं 'हे' गाणं; शूटसाठी आला तब्बल 1 कोटींचा खर्च title=
(Photo Credit : Social Media)

Lata Mangeshkar : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माता आणि स्क्रीनराइटर के. आसिफ म्हणजेच करीमुद्दीन आसिफ यांनी एक अप्रतिम चित्रपट बनवला होता. ज्याचं नाव 'मुगल-ए-आजम' असं होतं. या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर हा 1960 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला आणि दुर्गा खोटे मुख्य भूमिकेत दिसल्या. त्याकाळात जवळपास 1.5 कोटींचा बजेट असलेल्या या चित्रपटानं तेव्हा 110 मिलियन कमाई केली होती. आज या चित्रपटाविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया. 

हा चित्रपट तयार होण्यासाठी जवळपास 16 वर्ष लागली. हा चित्रपट वर्ल्ड सिनेमात सगळ्यात पहिला असा फीचर सिनेमा होता. ज्याला थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याआधी पुन्हा एकदा कलरफूल करण्यात आलं. या चित्रपटातलं 'प्यार किया तो डरना क्या' हे गाजलेलं गाणं शूट करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. तर त्यावेळी एक चित्रपट करण्यासाठी देखील यापेक्षा कमी मानधन लागायचं. त्यातही अगदी बोलायचं झालं तर 10 लाख रुपयां पेक्षा कमीमध्ये एक चित्रपट तयार व्हायचा. तर या गाण्याविषयी बोलायचे झाले तर हे गाणं गीतकार शकील बदायुनी यांनी तब्बल 105 वेळा लिहिलं होतं आणि मग त्याला म्यूजिक डायरेक्टर नौशाद यांनी याला होकार दिला होता. त्यानंतर हे गाणं शीश महालमध्ये शूट करण्यात आला. तर गाण्याचं रेकॉर्डिंग हे नौशाद यांनी लता मंगेशकर यांच्या कडून बाथरुममध्ये करून घेतली. 

या चित्रपटासाठी कपडे शिवण्यासाठी दिल्लीच्या शिंपीला बोलावण्यात आलं होतं. तर त्याच्यावर हातानं डिझाइन करण्यासाठी सूरतवरून एका स्पेशलिस्ट व्यक्तीला बोलावण्यात आलं होतं. हैदराबादच्या सोनाऱ्याकडून दागिने बनवण्यात आले होते. कोल्हापुरच्या कारागिरांनी मुकुट डिझाइन केलं होतं. त्याशिवाय या चित्रपटात वापरण्यात आलेली सगळी शस्त्रे ही राजस्थानातील लोहारांनी बनवली होती. आग्रा येथून बूट मागवले होते. युद्धाचे सीन चित्रित करण्यासाठी 2000 उंट, 4000 घोडे आणि 8000 सैनिक वापरण्यात आले. त्यांपैकी बरेचसे भारतीय सैन्याकडून घेतलेले सैनिक होते. ते सैनिक हे जयपूर रेजिमेंटमधून होते.

चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान, के. आसिफ यांच्यावर खूप कर्ज झालं होतं. त्यामुळे त्यांनी पान आणि सिगारेट देखील उधारीवर खरेदी केले होते. 1965 च्या युद्धानंतर पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटावर बॅन आणण्यात आलं होतं. पण चित्रपटाचं कलर्ड व्हर्जन तिथे प्रदर्शित झालं होतं. तर पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांमध्ये बंदी आणल्यानंतर प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट होता. 

दरम्यान, हा चित्रपट बनवण्याचा विचार हा 1944 मध्ये आला होता. पण चित्रपटाचं शूटिंग मात्र, अनेक वर्षांनंतर सुरु झालं. त्यात अनेक बदल करण्यात आले. सगळ्यात आधी फायनान्सर मागे सरकला होता. दुसरी गोष्टमध्ये कलाकारांमध्ये अनेक बदल करण्यात आले आणि एका गाण्याच्या शूटिंगसाठी चित्रपटाला लागणाऱ्या बजटपेक्षा जास्त होती. 

हेही वाचा : ...तर ‘गदर’ 2 गटार झाला असता! 'गदर 3' बद्दल बोलताना असं का म्हणाली अमीषा पटेल?

या चित्रपटाचं तिकिट खरेदी करण्यासाठी लाखोच्या संख्येनं लोकांनी गर्दी केली होती. अनेक दिवस ओलांडल्यानंतरही लोकांना तिकिटं मिळत नव्हती. तर काही लोक हे अनेक दिवस तिकिटाच्या लाईनीत रहायचे आणि ते दिवस-रात्र थांबल्यानंतर ते तिकिट काऊंटरच्या जवळ पोहोचायचे. तर जे लोक तिकिट घेण्यासाठी लाईनमध्ये उभे आहेत त्यांच्या कुटुंबातील लोक त्यांना तिथेच जेवणाचा डब्बा आणून द्यायचे.