शाहरूख खान थुंकला की फुंकला? काय आहे ही परंपरा

शाहरूख खान आर्यन खान प्रकरणानंतर पहिल्यांदा आला समोर, तेव्हाही ट्रोलर्सने केलं टार्गेट 

Updated: Feb 7, 2022, 01:21 PM IST
शाहरूख खान थुंकला की फुंकला? काय आहे ही परंपरा  title=

मुंबई : बॉलिवूड स्टार शाहरुख खान सध्या एका कारणावरून ट्रोल होत आहे. लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी मास्क खाली करून शाहरूख थुंकल्याचा आरोप ट्रोलर्स करत आहेत. पण शाहरूख खानने जे केलं ते एका परंपरेचा भाग आहे. ती परंपरा नेमकी काय पाहा

दीदींच्या अंत्यदर्शनावेळी शाहरुखनं आधी दुवा मागितली. मग हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर शाहरुख मास्क खाली करून थुंकला असा आरोप ट्रोलर्स करत आहेत. याच व्हिडीओचा आधार घेत ट्रोलर्स शाहरूखला ट्रोल करत असून लतादीदींचा अपमान केल्याची टीकाही केली जात आहे.

पण, इस्लाम रिवाजानुसार मृताच्या पार्थिवावर फुंकर मारली जाते...तसंच शाहरुखनंही केलं...मात्र, शाहरूखच्या या कृतीवर लोक ट्रोल करत आहेत. ट्रोलर्सच देशाची वाट लावतायत असं संजय राऊत म्हणालेत. (लता मंगेशकर यांच्या पार्थिवाजवळ शाहरुखची अल्लाहकडे दुआ ! सोशल मीडियावर सुरु झाली टीका) 

तर याला थुंकणं म्हणत नसून, एक मुस्लिम समाजात दुवा केल्यानंतरची परंपरा असल्याचं विचारवंत नौशाद उस्मान, मुस्लिम अभ्यासक सांगत आहेत.

लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शाहरुख खान थुंकला असा सांगितल्या जातंय त्याचा व्हीडिओ सुद्धा व्हायरल होतोय. 

मात्र मुस्लिम समाजाची दुवा केल्यानंतरची एक पद्धत आहे. याला 'दम' म्हणतात यात काहीही चूक नाही.