मूसेवालाला लागली होती मरणाची चाहूल; या 2 गाण्यांमधून दिले होते संकेत?

थारमधून मूसेवालाची "LAST RIDE" 295 गाण्यातील तारीख ठरली आयुष्यातली शेवटची....

Updated: May 30, 2022, 01:07 PM IST
मूसेवालाला लागली होती मरणाची चाहूल; या 2 गाण्यांमधून दिले होते संकेत? title=

मुंबई : सिद्धू मूसेवालाची दोन गाणी सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. या दोन गाण्यांचा आणि सिद्ध मूसेवालाच्या मृत्यूचा संबंध लावला जात आहे. अनेकांनी असा दावा केला की त्याला मृत्यूची चाहूल लागली होती. त्याची दोन गाणी सध्या तुफान चर्चेचा विषय ठरली आहेत.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येने देशात खळबळ उडाली. मात्र सिद्धू मूसेवालाने त्याच्या जीवाला धोका असल्याचे संकेत आधीच दिले होते. सध्या त्याची द लास्ट राइड आणि 295 लगेगी ही दोन गाणी सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंड करत आहेत. त्यांच्या शीर्षकातच त्यांच्या मृत्यूचा इशारा होता हा योगायोग समजला जात आहे. 

10 महिन्यांपूर्वी त्यांनी 295 लागेगी हे गाणे रिलीज केलं होतं. पंजाबमधील धर्मग्रंथातील अपमानावर असल्याचं सांगितलं जात होतं. त्याचे शब्द होते - मी खरे बोललो तर 295 लागेल. सिद्धूची हत्याही बरोबर याच आकड्याची फोड करून करण्यात आली. 29 मे रोजी त्याच्यावर गोळीबार झाला. 

15 मे रोजी द लास्ट राईड गाणं रिलीज झालं होतं. या गाण्याला एक कोटी तीन लाखहून अधिक लाईक्स मिळाले होते. या गाण्याचे बोल 'जवान लड़के की आंखें सब कुछ कह रही हैं, कह रही हैं कि जवानी में ही जनाजा उठ जाएगा। मौत न जाने कब दस्तक दे दे... आणि 29 मे रोजी त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.