Laal Singh Chaddha : लाल सिंह चड्ढा पाहून नेहा धुमियाचं मोठं वक्तव्य; तुम्हालाही बसेल धक्का

बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट लाल सिंग चड्ढा सध्या चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. लालसिंग चड्ढा त्याच्या अपेक्षेनुसार कामगिरी करू शकत नाही. दरम्यान, या चित्रपटाबद्दल सर्व हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्स सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. आता यामध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपियाच्या नावाचाही समावेश झाला आहे. अलीकडेच नेहाने लाल सिंग चड्ढाचं कौतुक करताना आमिर खानसाठी एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

Updated: Aug 16, 2022, 11:29 PM IST
Laal Singh Chaddha : लाल सिंह चड्ढा पाहून नेहा धुमियाचं मोठं वक्तव्य;  तुम्हालाही बसेल धक्का title=

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट लाल सिंग चड्ढा सध्या चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. लालसिंग चड्ढा त्याच्या अपेक्षेनुसार कामगिरी करू शकत नाही. दरम्यान, या चित्रपटाबद्दल सर्व हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्स सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. आता यामध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपियाच्या नावाचाही समावेश झाला आहे. अलीकडेच नेहाने लाल सिंग चड्ढाचं कौतुक करताना आमिर खानसाठी एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

नेहा धुपियाने  केला लाल सिंग चड्ढाचा रिव्यू
आमिर खान स्टारर लाल सिंग चड्ढा, 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून तो सध्या बॉक्स ऑफिसवर संघर्ष करत आहे. तसंच लाल सिंग चड्ढाला चित्रपट समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपियाने लाल सिंह चड्ढा सिनेमा पाहिला आहे. त्यानंतर, या चित्रपटाचा रिव्यू करत नेहाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिलं की,लाल सिंह चड्ढा हा चित्रपट नसून एक जादू आहे.

चांगुलपणाच्या दुनियेत घेऊन जाणारा हा चित्रपट आहे.आमिर खान एक जिनीयस दाखवण्यात आलं आहे. त्याने चित्रपटाला खूप महत्त्व दिलं आहे. ही नोट लिहिण्यासोबतच  चित्रपटाशी संबंधित काही सीन्स माझ्या मनात डोकावत आहेत. तुम्ही कोणाच्याही बोलण्यावर बळी पडू नका आणि वेळात-वेळ काढून  या कलेचा तुकडा पाहण्यासाठी तुम्ही आलचं पाहिजे.

 बॉक्स ऑफिस लाल सिंह चड्ढा करतोय संघर्ष
नेहा धुपियासह बरेच बॉलीवूड कलाकर लाल सिंग चड्ढाची स्तुती करत आहेत. पण प्रत्यक्षात आमिर खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर संघर्ष करताना दिसत आहे.  लाल सिंह चड्ढाने आतापर्यंत रिलीजच्या 5 दिवसांत 45 कोटी कमावले आहेत. जे आमिरच्या स्टारडमनुसार खूपच कमी आहेत.