'कुछ कुछ होता है' मधील छोटा सरदार दिसतो आता असा, फोटो पाहून चाहते म्हणतायेत, 'तुस्सी इतने बड़े कब हुए?'

टीव्हीपासून ते बॉलिवूड स्टार्सपर्यंत छोट्या स्टार्सनी आपल्या अभिनयाने मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातला आहे. 

Updated: Jan 9, 2022, 09:04 PM IST
'कुछ कुछ होता है' मधील छोटा सरदार दिसतो आता असा, फोटो पाहून चाहते म्हणतायेत, 'तुस्सी इतने बड़े कब हुए?' title=

मुंबई : टीव्हीपासून ते बॉलिवूड स्टार्सपर्यंत छोट्या स्टार्सनी आपल्या अभिनयाने धुमाकूळ घातला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक छोटे कलाकार आहेत ज्यांची शैली आणि संवाद मोठ्या लोकांनीही आवडीने स्वीकारले आहे. या यादीत काही आठवणीत राहतील असे अनेक छोटे स्टार्स आहेत. असाच एक बालकलाकार म्हणजे, 'तुस्सी जा रहे हो?' हा डायलॉग बोलणारा त्याचवेळीचा छोटे सरदार म्हणजेच परजन दस्तूर. नुकतेच परजन दस्तूरचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.

सोशल मीडियावर व्हायरल परजान 
अलीकडे परजन दस्तूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही की, आज छोटा सरदार इतका मोठा झाला आहे. विशेष म्हणजे परजनचं लग्नही पार पडलं आहे. परजनने याच वर्षी डेलना श्रॉफशी लग्न केलं. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मोठ्या सिनेमात केलंय काम
परजन दस्तूरने एक नाही तर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती म्हणजे कुछ कुछ होता है मधील छोट्या सरदारच्या भूमिकेमुळे. त्याची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. 'कुछ कुछ होता है' व्यतिरिक्त तो 'कहो ना प्यार है' 'मोहब्बतें' 'जुबैदा, 'कभी खुशी कभी गम' 'हाथी का अंडा', 'हम तुम', 'सिकंदर' यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये दिसला आहे.