व्हिडिओ : ...अन् कृतीची बहिण धपकन् पडली!

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतसोबत आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. 

Updated: Jul 28, 2018, 12:49 PM IST
व्हिडिओ : ...अन् कृतीची बहिण धपकन् पडली! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतसोबत आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. अलिकडेच हाऊसफुल 4 च्या शूटिंगचे पहिले शेड्यूल पूर्ण करून कृती लंडनवरुन परतली. मुंबईत तिने वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात कृतीची लहान बहिण नुपूरसोबत असे काही झाले.

काय झालं नेमकं?

कृतीची बहिण नुपूर मॉडेल आहे. नुपूर निर्माता दिनेश विजान आणि कृतीच्या बर्थडे पार्टीला जात होती. तेव्हा चालता चालता ती धपकन पडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कृतीची बहिण नुपूर कारमधून उतरते आणि वेन्यूच्या दिशेने जात असते. तेव्हा अचानक तिचा पाय घसरतो आणि ती धपकन् खाली पडते. अलिकडे असा प्रसंग बॉलिवूड अभिनेत्री काजोलवर ओढावला होता. व्हिडिओ :... आणि काजोल पाय घसरून धपकन पडली

 

पहा व्हिडिओ...

व्हिडिओत तुम्ही पहाल की, नुपूर पडते आणि स्वतःला सावरते देखील. मॉडेलिंग जगात नुपूर लोकप्रिय आहे. आपल्या बहिणीप्रमाणे ती देखील अभिनयात येऊ शकते, असे बोलले जात होते. 

पार्टीला स्टार्सची हजेरी

खास गोष्टी ही की, कृती आणि निर्माता दिनेश विजान यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. दिनेशने मुंबईतील रेस्टोरंटमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. यात कृती सेनन, सुशांत सिंग राजपूत, मनीष मल्होत्रा, करण जोहर, श्रद्धा कपूर हे स्टार्स उपस्थित होते. तर वरुण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत पार्टीला हजर झाला होता. कृतीच्या बर्थडे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.