बेडरुममधला व्हिडीओ शेअर करत Kriti Sanon म्हणाली, "आज रात्री मी एकटी नाही..."

क्रिती सेननने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर  व्हिडिओ शेअर केला आहे. 

Updated: Aug 31, 2022, 05:25 PM IST
बेडरुममधला व्हिडीओ शेअर करत Kriti Sanon म्हणाली, "आज रात्री मी एकटी नाही..." title=

Kriti Sanon Bedroom Video: फिल्मफेयर अवॉर्ड शोमध्ये काही कलाकारांना सन्मानित करण्यात आलं. या अवॉर्ड शोमध्ये उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून क्रिती सेननचा सन्मान करण्यात आला. क्रितीला 'मिमी' या चित्रपटातील भूमिकेसाठी गौरविण्यात आलं. यानंतर क्रितीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. क्रिती सेननने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर  व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अभिनेत्रीच्या बेडरूममधला आहे. यात अभिनेत्री क्रिती सेनननं सांगितलं आहे की, 'आज रात्री ती एका खास व्यक्तीसोबत आहे.' 

या व्हिडीओसोबत क्रितीने खास कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी आज रात्री एकटी झोपत नाहीये. मला प्रेमाच्या उकल्या फुटत आहेत. ब्लॅक लेडी शेवटी घरी आली आहे. या पुरस्कारासाठी आणि माझे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल फिल्मफेअरचे आभार.' क्रिती सेनन 'भेडिया', 'गणपत', 'आदिपुरुष' आणि 'शहजादा' या चित्रपटात दिसणार आहे. क्रिती 'आदिपुरुष'मध्ये प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्याचबरोबर ती 'शेहजादा'मध्ये कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'डिनो आणि लक्ष्मण सरांचे खूप खूप आभार..त्यांनी या भूमिकेसाठी माझी निवड केली. तसेच पाठिंबा दिला. तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. चित्रपटातील कलाकार आणि क्रू मेंबर्सनं हा चित्रपट खास बनवला. प्रिय प्रेक्षक आणि माझे चाहते, ज्यांनी मिमी आणि मला खूप प्रेम दिले. मम्मी, पापा आणि नुपूर... मी केले. आता पुढच्या स्वप्नांसाठी सज्ज.', असंही तिने पुढे लिहिलं आहे.