कुटुंबातील व्यक्ती नसूनही 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला बिग बींच्या घरात स्थान

आता म्हणे त्यांच्या घरात एका अभिनेत्रीलाही राहण्यास परवानगी दिली आहे.   

Updated: Oct 21, 2021, 06:57 AM IST
कुटुंबातील व्यक्ती नसूनही 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला बिग बींच्या घरात स्थान title=

मुंबई : महानायक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता अमिताभ बच्चन यांनी कायमच त्यांच्या राहणीमानानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मुंबईत आलिशान घरात राहणाऱ्या या अभिनेत्यानं आता म्हणे त्यांच्या घरात एका अभिनेत्रीलाही राहण्यास परवानगी दिली आहे. 

कुटुंबातील व्यक्ती नसतानाही थेट बिग बींच्या घरात राहण्याची संधी मिळालेली ही अभिनेत्री कोण असाच प्रश्न तुम्हाला पडला ना? लक्ष्मण उत्तेकर यांच्या 'मिमी'तून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आणि आता 'हम दो हमारे दो' या चित्रपटासाठी तयारी करणारी ही अभिनेत्री आहे क्रिती सेनन. (Kriti sanon new rented house of Amitabh bachchan)

क्रितीनं म्हणे अमिताभ बच्चन यांचं मुंबईतील अंधेरी भागात असणारं ड्युप्लेक्स अपार्टमेंट भाड्यानं घेतलं आहे. तिला हे घर फारच आवडलं असून, येत्या काही दिवसांतच ती तेथे वास्तव्यास जाणार आहे. गेल्या काही काळापासून क्रिती नव्या घराच्या शोधात होती. जेव्हा तिनं हे घर पाहिलं तेव्हा ती या घराच्या प्रेमातच पडली, अशी माहिती सुत्रांनी दिली. 

क्रितीसाठी बिग बींचं हे घर यशाची नवी शिखरं आणणारं ठरेल यात शंका नाही. कारण येत्या काळात ती बऱ्याच मोठ्या प्रोजेक्टसाठी काम करताना दिसणार आहे. यातील काही प्रोजेक्टमध्ये ती प्रभास, अक्षय कुमार, वरुण धवन, टायगर श्रॉफ या अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.