वयाच्या १८व्या वर्षी केएल राहुलच्या पाकिटात कंडोम मिळालं अन्...

स्वतः के.एल.राहुलने केला खुलासा 

वयाच्या १८व्या वर्षी केएल राहुलच्या पाकिटात कंडोम मिळालं अन्...  title=

मुंबई : करण जोहरचा टॉक शो 'कॉफी विथ करण' मध्ये पहिल्यांदा भारतीय क्रिकेट संघाचे दोन खेळाडू आले आहेत. या शोच्या पुढच्या एपिसोडमध्ये के.एल.राहुल आणि हार्दिक पांड्या पाहुणे म्हणून आले आहेत. 

या एपिसोडमध्ये के.एल.राहुल आणि हार्दिक पांड्या यांच्यातील बॉडिंग पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. एवढंच नव्हे तर या कार्यक्रमात दोघांनी आपल्या सेक्स लाइफचे सिक्रेट्स देखील शेअर केले आहेत. 

या एपिसोडमध्ये के.एल.राहुलने जेव्हा त्याच्या आईला बॅगेत कंडोम मिळाले तेव्हाचा किस्सा शेअर केला आहे. राहुलने सांगितलं की,'तेव्हा मी फक्त 18 वर्षांचा होतो. तेव्हा माझ्या मम्मीला माझ्या पर्समध्ये कंडोम मिळालं होतं.' पुढे त्याच्या आईने हा सगळा प्रकार राहुच्या वडिलांना सांगितला. तेव्हा ते त्याच्यावर खूप चिडले. जेव्हा मम्मी रात्री झोपायला गेली तेव्हा वडिल राहुलच्या खोलीत गेले. 

पुढे के.एल.राहुल यांने सांगितलं की, 'माझे वडिल म्हणाले, मी खूप आनंदी आहे की, तू या सगळ्याचा वापर करत आहेस. तुला सेफ राहायला हवं. मला माहित आहे, यावयात सगळ्यांसोबत असं होतं. पण आता तुला तुझ्या क्रिकेटवर फोकस करायला हवं.' तर याच प्रकरणाला पुढे नेत हार्दिक पांड्या म्हणाला की, 'माझे कुटुंबिय देखील याबाबतीत खूप ओपन आहेत.'

फक्त 9वी शिकलाय हार्दिक पांड्या 

या शोमध्ये हार्दिक पांड्याने सांगितलं की, तो फक्त 9 वी पर्यंत शिकला आहे. दुसरीच्या वर्गात हार्दिक अनेकदा नापास झाला. हार्दिकच्या मते तो फक्त उत्तर पत्रिकेत नाव आणि हजेरी क्रमांक लिहून येत असे. अनेकदा तर तो हजेरी क्रमांक देखील विसरत असे. 

हार्दिक सांगतो की, या सगळ्यात इंग्रजी ही एकच भाषा मी शिकत होतो आणि वाचू शकत होतो. त्याला हिंदी आणि इंग्रजी देखील वाचता येत नसे. जर कुणी त्याचं नाव हिंदीत लिहित असेल तर ते त्याला वाचता देखील येत नसे. 

एम.एस धोनी उत्तम कॅप्टन

शोच्या लोकप्रिय रॅपिड फायर राऊंडमध्ये के.एल.राहुल आणि हार्दिक पांड्या दोघांना विचारण्यात आलं की, धोनी आणि कोहली यात उत्तम कॅप्टन कोण? यावर के.एल.राहुल आणि हार्दिक पांड्याने एम.एस.धोनीचं नाव घेतलं.