अरेच्चा... इतक्या वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत रणवीर-दीपिका

तिच्या चेहऱ्यावर असणारा आनंद हा सर्वकाही सांगून जात होता 

Updated: Oct 22, 2018, 08:09 AM IST
अरेच्चा... इतक्या वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत रणवीर-दीपिका title=

मुंबई : 'राम- लीला या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी जोडी, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग या दोघांनीही त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. गेल्या कित्येक वर्षांपासून हे दोघंही रिलेशनशिपमध्ये असून, अखेर दीपिकानेच ते नेमकी किती वर्षे रणवीरला डेट करत होती याविषयीचा खुलासा केला आहे. 

'कॉफी विथ करण' या चॅट सोच्या नव्या पर्वात दीपिकाने याविषयीचा खुलासा केला. 

सेलिब्रिटींची उपस्थिती, न संपणाऱ्या रंजक गप्पा... या साऱ्यांचा सुरेख मेळ असणाऱ्या या शोच्या सहाव्या पर्वाचा पहिला भाग नुकताच प्रदर्शित झाला. 

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांची या पहिल्याच भागात उपस्थिती पाहायला मिळाली. 

दीपिका आणि आलियाने यावेळी करणच्या प्रश्नांना उत्तरं देत आपल्या आगामी चित्रपटांसोबत, कारकिर्दीसोबत खासगी आयुष्याविषयीही खुलेपणाने चर्चा केल्या. 

गप्पांच्याच ओघात आलियाने दीपिका आणि रणवीर यांच्या इन्स्टाग्राम पोस्टविषयी आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या त्यांच्या अनोख्या नात्याविषयी वक्तव्य करत रणबीर आणि तिच्या नात्यापेक्षा दीपिका- रणवीरचं नातं सोशल मीडियावर कशा प्रकारे सुपरहिट आहे, हे सांगितलं. 

आलियाच्या या वक्तव्यानंतर तिच्या आणि रणबीरच्या नात्याला अवघे काही महिने झाले असून, दीपिका आणि रणवीर कित्येक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं. त्याने यावेळी इशाऱ्याने पाच वर्षे दाखवण्याचा प्रयत्न केला. 

तेव्हाच दीपिकाने मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने ती आणि रणवीर गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं सांगितलं. 

दीपिका यावेळी आपल्या खासगी आयुष्याविषयी अगदी खुलेपणाने बोलताना दिसली. तिच्या चेहऱ्यावर असणारा आनंद हा सर्वकाही सांगून जात होता हेच खरं.