मुंबई: अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग म्हणजेच हिंदी कलाविश्वातील 'राम-लीला' लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावर अखेर या दोघांनीही त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली असून, आता 'दीप-वीर'च्याच लग्नाच्या चर्चांना उधाण येण्यास सुरुवात झाली आहे.
१४-१५ नोव्हेंबरला लोकप्रियतेच्या परमोच्च शिखरावर असणारी ही जोडी सहजीवनाची शपथ घेणार असून, सध्या जणू संपूर्ण कलाविश्वच त्यांच्या दिमाखदार विवाहसोहळ्यासाठी सज्ज होत आहे.
दीपिका आणि रणवीरने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केल्यानंतर सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.
आलिया भट्ट, मौनी रॉय, करण जोहर, क्रिती सनॉन, करिष्मा कपूर यांच्यासह जवळपास सर्वच सेलिब्रिटींनी 'दीप-वीर'ला शुभेच्छा दिल्या.
Many congratulations @deepikapadukone and @RanveerOfficial
Hope you have many beautiful Gooner kids together
Much love
— atul kasbekar (@atulkasbekar) October 21, 2018
Ohhhhh myyyyy congratulations to the most amazing couple @RanveerOfficial and @deepikapadukone https://t.co/55amZVpoL0
— Amruta Khanvilkar (@AmrutaOfficial) October 21, 2018
बऱ्याच काळापासून चर्चेत असणाऱ्या या प्रेमकहाणीला अखेर हे सुरेख वळण मिळाल्याचा आनंद सर्वांनीच ट्विट करत आणि सोशल मीडिया पोस्ट करत व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.
लग्नाची घोषणा केल्याच्या अवघ्या काही मिनिटांनंतरच दीपिका आणि रणवीरच्या नावांचे हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आले होते. त्यामुळे आता येते काही दिवस तरी कलाविश्वात या बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्याच्या चर्चाच रंगणार असं म्हणायला हरकत नाही.
Congratulations to @deepikapadukone and @RanveerOfficial ! A lifetime of love, laughter and lustre to the both of you.
— Rahul Bose (@RahulBose1) October 21, 2018
Yasssss! Bestest news!! You & @deepikapadukone make the most wonderful, gorgeous couple!! Wish you guys all the happiness in the world as you begin this new journey together!! @RanveerOfficial https://t.co/zuxACnDl8m
— Sophie Choudry (@Sophie_Choudry) October 21, 2018
Congrats buddy!!! What lovely news! Wish @deepikapadukone and you all the happiness in the world! https://t.co/n0KczSdeIy
— Milap (@zmilap) October 21, 2018