प्रियांका चोप्राच्या या फ्लोरल ड्रेसची किंमत माहीत आहे का?

प्रियांकाचा हा ड्रेस सुंदर आहेच... पण तो चर्चेत आहे त्याच्या किंमतीमुळे...

Updated: Sep 25, 2018, 12:21 PM IST
प्रियांका चोप्राच्या या फ्लोरल ड्रेसची किंमत माहीत आहे का? title=

मुंबई : ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांच्या साखपुड्यासाठी बॉलिवूड मंडळी इटलीमध्ये दाखल झाले होते. 21 ते 23 सप्टेंबरपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात प्रियांका चोप्रापासून सोनम कपूरपर्यंत अनेकांनी सहभाग नोंदवला. इटलीत दाखल झालेली प्रियांका या सोहळ्यानंतर पुन्हा एकदा 'मिलान फॅशन वीक'मध्ये दिसली. यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आलीय... पण, सध्या चर्चा सुरू आहे ती प्रियांकाची किंवा तिच्या ड्रेसची नाही तर त्या ड्रेसच्या किंमतीची... 

मिलान फॅशन वीकमध्ये प्रियांका पिवळ्या रंगाच्या फ्लोरल लूकमध्ये दिसली. प्रियांकाचा हा ड्रेस सुंदर आहेच... पण तो चर्चेत आहे त्याच्या किंमतीमुळे... सामान्यांच्या एका महिन्याच्या पगारापेक्षा प्रियांकाच्या या ड्रेसची किंमत जास्त होती. 

प्रियांकाच्या या ड्रेसची किंमत आहे 497 डॉलर... म्हणजेच जवळपास 36,000 रुपये... प्रियांकानं आपला हा ड्रेस stalvey बॅग आणि लग्झरी ब्रॅन्ड FAR च्या फुटवेअर्ससोबत मॅच केला. प्रियांकाचा हा लूक उन्हाळ्यासाठी परफेक्ट स्टाईल आहे.

ईशा अंबानीच्या साखरपुड्यासाठी इटलीत दाखल झालेली प्रियांका बॉयफ्रेंड निक जोनास आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत दिसली होती... तर 'मिलान फॅशन वीक' दरम्यान तिच्यासोबत होते तिचा भाऊ सिद्धार्थ आणि आई मधु चोप्रा...