मनोज पाटीलला टॉचर करणारा Sahil Khan कसा बनला कोटींचा मालक?

बॉलिवूडच्या दोन चित्रपटांमध्ये तो दिसला आहे.

Updated: Sep 17, 2021, 09:49 AM IST
मनोज पाटीलला टॉचर करणारा Sahil Khan कसा बनला कोटींचा मालक? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि फिटनेस आयकॉन साहिल खानचे नाव चर्चेत आले जेव्हा मिस्टर इंडिया मनोज पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सुसाईड नोटमध्ये साहिल दोषी असल्याचं म्हटलं. मनोजने 2016 मध्ये मिस्टर इंडियाचे विजेतेपद पटकावले आहे. एवढेच नाही तर त्याने देशभरात अनेक बॉडी बिल्डींग स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. मनोजने साहिलवर स्वत: ला मानसिक छळ केल्याचा आणि स्वतःला सोशल मीडिया गुंडगिरीचा बळी बनवल्याचा आरोप केला आहे.

साहिल खानबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडच्या दोन चित्रपटांमध्ये तो दिसला आहे. त्यांने 2001 मध्ये 'स्टाईल' या चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये काही विशेष छाप पाडू शकला नाही, त्यानंतर त्याला फक्त काही चित्रपट मिळू शकले, परंतु सर्व बॉक्स ऑफिसवर पडले. चित्रपटांमध्ये सुपर फ्लॉप ठरलेला साहिल आज सुपर लक्झरी लाइफ जगतो, जरी तो बॉलिवूडमध्ये आपले नाव कमवू शकला नसला तरी त्याचे वार्षिक उत्पन्न करोडोंचे आहे.

साहिल चित्रपटांमध्ये फ्लॉप झाला पण फिटनेसच्या जगात त्याचं एक वेगळं अस्तित्व आहे. तो आता फिटनेस आयकॉन बनला आहे आणि भरपूर पैसे कमवतो. जेव्हा साहिलला चित्रपटांमध्ये काम मिळणे बंद झाले, तेव्हा त्याने स्वतःची एक जिम उघडली. त्याला या कामाचा खूप फायदा झाला, त्यानंतर तो देशभरात एकामागून एक जिम सुरु करत गेला. फिटनेसच्या जगात तो आज मोठे नाव आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

साहिल वादात येण्याची ही पहिली वेळ नाही, साहिलने 2004 साली बॉलिवूड अभिनेत्री निगार खानशी लग्न केले, पण आज ते दोघे एकमेकांपासून वेगळे राहतात. 2009 मध्ये तो अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफला डेट केल्यामुळे चर्चेत होता, जो स्वतःहून 17 वर्षांनी मोठा आहे.