क्रिती सेननच्या संपत्ती बद्दल ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!!!

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Updated: Jul 27, 2021, 06:34 PM IST
क्रिती सेननच्या संपत्ती बद्दल ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!!! title=

मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्रितीने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत आणि अतिशय कमी वेळात चाहत्यांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. क्रितीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात तेलगू चित्रपटातून केली. या सिनेमात ती महेश बाबू यांच्या सोबत दिसली होती. तेलुगु इंडस्ट्रीत पदार्पण करणारी क्रिती आता बॉलिवूडवर राज्य करत आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की, क्रिती कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे. आज आम्ही तुम्हाला क्रितीच्या संपत्तेविषयी सांगणार आहोत. 

हिरोपंती सिनेमातून क्रितीने बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं. या सिनेमात तिने टायगर श्रॉफसोबत डेब्यू केला होता. आपल्या पहिल्या सिनेमानंतर क्रितीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. क्रिती लवकरच अजून बड्या-बड्या सिनेमांत दिसणार आहे.

एका रिपोर्टनुसार, क्रिती सेनेन 29 करोडच्या संपत्तीची मालकिण आहे. क्रितीची कमाई एक्टिंग आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून होते. क्रिती एका सिनेमासाठी 2 करोड ईतकी फि आकारते. याचबरोबर ती स्टेज शो देखील करते. क्रितिचा स्वत:चा एक कपड्याचा ब्रँडदेखील आहे.

एका रिपोर्टनुसार क्रिती 15 ब्रँड एंडोर्स करते. ज्यामध्ये बाटा, अर्बन क्लॅप, टाईटन, रागा, याशिवाय अनेक ब्रँड यांमध्ये सामिल आहेत. दरवर्षी क्रिती ब्रँड एंडोर्समेंटमधून 2 करोड रुपये कमावते.

प्रोजेक्टची आहे लाईन
क्रिती सेननकडे आता बरेच बडे सिनेमा आहेत. नुकताच क्रितीचा मिमी हा सिनेमा ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या सिनेमात तिने सेरोगेट मदरची भूमिका साकारली आहे.  या सिनेमात क्रितीसोबत पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहे. याचबरोबर ती अक्षय कुमारच्या बच्चन पांडे सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची शूटिंग नुकतीच संपली आहे. कृती पॅन इंडिया फिल्म आदिपुरुषमध्ये ही झळकणार आहे. या सिनेमात क्रिती सिताची भूमिका पार पाडणार आहे. हा प्रोजेक्ट क्रितीचा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट असणार आहे.