Kisore Kumar : 60-70 च्या दशकात सगळ्यात लोकप्रिय गायक होते ते म्हणजे ज्येष्ठ गायक, अभिनेते किशोर कुमार. त्यांच्या गायिकीवर सगळेच जणं फारच फिदा होते. आजही त्यांच्याविषयी भरपूर लिहिले जाते. आज 13 ऑक्टोबर आहे. किशोर कुमार यांची पुण्यतिथी आहे. त्यांना जाऊन 36 वर्षे झाली आहेत. 13 ऑक्टोबर 1987 साली त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानं हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती. इतका समधुर आवाज, साधं व्यक्तिमत्त्वं, दिलदारपणा, कर्तृत्व आणि प्रचंड लोकप्रियता. यामुळे किशोर कुमार यांचे नावं हे फार मोठे होते. त्यामुळे अचानकच त्यांच्या निधनानं हिंदी चित्रपटसृष्टीला फारच मोठा धक्का बसला. आज या लेखातून आपण जाणून घेऊया किशोर कुमार यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी.
किशोर कुमार यांचे गाणे ऐकल्यावर शांतता :
किशोर कुमार यांनी बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत. त्यांची गाणी ही आजच्या तरूणांच्याही प्लेलिस्टमध्ये असतात. तुमच्याही प्लेलिस्टमध्ये असतीलच. कधीतरी आपला मूड हा गेलेला असतो किंवा आपला दिवस हा चांगला जाण्यासाठी आपल्याला गरज असते ती म्हणजे असं काहीतरी करण्याची ज्यामुळे आपल्याला फार आनंद होईल. पहिली गरज असते ती म्हणजे एका बुस्टिंग आणि हे बुस्टिंग असतं ते म्हणजे एखाद्या लोकप्रिय कलाकाराचे गाणं ऐकणं आणि हे गाणं असतं ते म्हणजे किशोर कुमार यांचं. किशोर कुमार यांचं गाणं ऐकल्यावर आपला मुड नक्कीच बुस्ट होतो.
हेही वाचा : आता अजिबात पैसे उरलेले नाहीत! मराठमोठ्या अभिनेत्रीवर ही वेळ का आली?
काय सांगता, किशोर कुमार यांच्या घरात होता मानवी सांगाडा?
असं म्हणतात की किशोर कुमार यांना मीडिया अटेंशन अजिबातच पसंद नव्हते. त्यातून ते एकटे राहणंच पसंत करायचे. त्यांना मुलाखत देणंही पसंत नव्हतं. लोकंही त्यांना कमी भेटायला यायचे. लोकं येऊन नयेत म्हणून त्यांनी घराच्या लिव्हिंग रूममध्येच हाडं आणि सांगाडे लावले होते. सोबतच खोलीत लाल दिवा लावला होता. ज्यानं जास्त लोकं त्यांच्या घरी येऊ शकत नव्हती. पण तुम्हाला माहितीये का की किशोर कुमार हे हॉरर चित्रपटांना घाबरायचे.
अर्ध्या पैशांत काम
तुम्हाला माहितीये का की ते अर्ध्या पैशांतच काम करायचे. ते एका फिल्मची शुटिंग करत होते. तेव्हा त्यांना सांगितले की त्यांना त्याचे अर्धेच पैसे मिळतील. मग त्यांनी अर्धाच मेकअप केला होता. तेव्हा त्यांना विचारण्यात आले की तुम्ही अर्धाच मेकअप का केलात तेव्हा ते म्हणाले की, ''अर्धे पैसे, अर्ध कामं''.
मृत्यूच्या दिवशीच केलेलं मरणाचं नाटकं?
13 ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांची पत्नी लीना चंदावरकर त्यांना उठवायला गेली होती. तेव्हा त्यांनी पाहिलं की किशोर कुमार यांचा चेहरा हा पडलेला होता. त्या घाबरल्या परंतु जेव्हा त्या त्यांच्या जवळ गेल्या तेव्हा मात्र त्यांनी पटकन डोळे उघडले आणि मग ते म्हणाले, काय तु घाबरलीस? आज तर माझी सुट्टी आहे. तेव्हा त्यांनी मुद्दामून हे नाटकं केले होते. परंतु पुढच्या काही तासातच सगळं काही बदललं. जेवण झाल्यानंतर किशोर कुमार यांना अस्वस्थ वाटू लागले होते. ते त्यांच्या पत्नीला म्हणाले की त्यांना फार विकनेस आला आहे. जेव्हा त्या डॉक्टरांना फोन करायला गेल्या तेव्हा किशोर कुमार त्यांना म्हणाले की, तू जर का डॉक्टरांना बोलावलंस तर मी मरेन. तेव्हा परत त्यांना असं वाटलं की किशोर कुमार खरंच गंमत करत आहेत. पण तो क्षण शेवटचा ठरला.