मुंबई : अमेरिकन रिएलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन तिच्या ग्लॅमरस फोटो, लूक आणि रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. पण किम कार्दशियन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. किम आणि पहिला पती रॅपर कान्ये वेस्टमध्ये वाद असल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत आहे. दोघांमधील भांडणं आता सर्वत्र चर्चा विषय बनला आहे. दरम्यान, एका पोस्टच्या माध्यमातून कान्येने किमच्या कुटुंबावर हल्ला चढवत पोर्नोग्राफीमुळे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं म्हटलं आहे.
एवढंच नाही तर त्याने स्वतःला पॉर्न अॅडिक्ट झाल्याचं देखील सांगितलं. कान्येने एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये कान्येने मुलींना पॉर्नोग्राफीच्या दलदलीत फसू देणार नाही, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
शिवार कान्येये पोस्टमध्ये किमच्या आईला देखील आरोपी ठरवलं आहे. कान्येने पोस्ट लिहिलं की, 'जर क्रिस तुमच्याकडून प्लेबॉय शूट करुन घेत असेल तर, बिलकूल करू नका. जे त्यांनी किम आणि कायलीसोबत केलं आहे...'
पुढे कान्ये म्हणाला, 'हॉलिवूड सर्वात मोठं वेश्यालय आहे. मला त्याची सवय लागली होती. इंस्टाग्राम त्याचा प्रचार करत आहे. मी नॉर्डी आणि शिकागोला यात अडकू देणार नाही." नॉर्डी आणि शिकागो या कान्ये वेस्ट आणि किम कार्दशियन यांच्या मुली आहेत.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून किम आणि कान्येमध्ये वादाची ठिकणी पेटली आहे. किम कार्दशियनने 2007 मध्ये प्लेबॉय मासिकासाठी आणि 2019 मध्ये तिची बहीण कायलीने जेनरसाठी फोटोशूट केलं होतं. किमने 2014 मध्ये कान्येशी लग्न केले. मार्च 2022 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली.