कियारा अडवाणीच्या 'या' छोट्या बॅगच्या किंमतीत येतील अनेक फोन, Price जाणून व्हाल थक्क

कियारा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Updated: Aug 22, 2022, 09:41 AM IST
कियारा अडवाणीच्या 'या' छोट्या बॅगच्या किंमतीत येतील अनेक फोन, Price जाणून व्हाल थक्क title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कियारा ही तिच्या चित्रपटांसोबत तिच्या स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. कियाराचा प्रत्येक लूक हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. कियाराच्या कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक महागड्या गाड्या आहेत. आता कियाराच्या एका महागड्या बॅगनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. (Kiara Advani Costly Sling Bag) 

आणखी वाचा : अरबाज आणि मलायकाच्या लग्नात असा दिसत होतो अर्जुन कपूर, फोटो पाहून व्हाल हैराण

खरंतर, कियारा नुकतीच धर्मा प्रॉडक्शनच्या जुन्या कार्यालयाबाहेर बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली. या जोडप्याला एकत्र पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. दुसरीकडे कियारा तिच्या कॅज्युअल लूकमध्ये सुंदर दिसत होती. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की ते दोघं पापाराझींना पाहून आनंदी नाही आहेत. यादरम्यान कारमध्ये बसलेल्या सिद्धार्थला बाहेरच्या गर्दीचा राग आला होता. (Sidharth Malhotra and Kiara Advani Together)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी कियारानं निळ्या रंगाची जीन्स आणि सिंपल व्हाइट टी-शर्ट परिधान केला होता. यावेळी मिनिमल मेकअपमध्ये कियारा दिसली. पण सगळ्यांचे लक्ष हे कियाराच्या स्लिंग बॅगनं वेधले. कियाराची ही स्लिंग बॅग 'Louis Vuitton' या बॅन्डची आहे. या बॅगची किंमत 1.9 लाख रुपये आहे. 

kiara-advani-spends-this-much-whooping-amount-on-this-small-sling-bag-you-can-buy-many-phones

दरम्यान, कियाराचा 'जुग जुग जियो हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. तर लवकरच कियारा 'गोविंदा नाम मेरा' आणि तेलगू चित्रपट 'RC 15' मध्ये दिसणार आहे. तर सिद्धार्थ 'मिशन मजनू', 'थँक गॉड' आणि रोहित शेट्टीच्या कॉप-ड्रामा वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.