Sidharth Malhotra ला भेटण्यासाठी किआरा गुपचूप पोहोचली 'या'ठिकाणी, Video Viral

सिद्धार्थला भेटण्यासाठी किआरा पोहोचली 'या' थराला.... व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रंगतेय तुफान चर्चा  

Updated: Aug 3, 2022, 03:28 PM IST
Sidharth Malhotra ला भेटण्यासाठी किआरा गुपचूप पोहोचली 'या'ठिकाणी, Video Viral title=

मुंबई : इंडस्ट्रीमध्ये सेलिब्रिटींच्या नात्याच्या चर्चा कायम जोर धरत असतात. काही दिवसांपूर्वी 'शेरशाह' स्टारर अभिनेत्री किआरा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा तुफान रंगली. ब्रेकअपच्या चर्चांनंतर दोघांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. पण आता दोघेही एकत्र वेळ व्यतीत करण्यासाठी उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी किआराने सिद्धार्थसोबत दुबईमध्ये वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. एवढंच नाही तर, दोघांना एकत्र एअरपोर्टवर देखील स्पॉट करण्यात आलं. 

दरम्यान, किआराचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. कियारा अडवाणी आज म्हणजेच बुधवारी सिद्धार्थ मल्होत्राच्या घराबाहेर दिसली. आता किआराच्या या फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहे.

यावेळी किआरा अडवाणी नो मेकअप लूकमध्ये दिसली. कियारा जिम वेअरमध्ये सिद्धार्थच्या घरी पोहोचली होती. तेथे पोहोचल्यानंतर अभिनेत्रीने पापाराझींकडेही दुर्लक्ष करत पुढे निघून गेली. .

किआराचे सिनेमे... 
कियाराने 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'लक्ष्मी गुड नवाज', 'कबीर सिंग' आणि 'शेरशाह' यांसारख्या सिनेमांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवलं आहे. यावर्षी अभिनेत्रीचे दोन सिनेमे 'भूल भुलैया 2' आणि 'जुग जुग जिओ' दोना सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.