मुंबई : 'खुलता कळी खुलेना' मालिकेतील अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवरा आणि अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेड येथे राहत्या घरी गळफास लावून घेतला. या प्रकरणाची पोलिस तपासणी सुरू आहे. पोलिसांच्या हाती अद्याप कोणतेही पुरावे लागलेले नाहीत. आशुतोषला अनेक दिवसांपासून नैराश्य आलं होतं. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांचे उपचारही त्याच्यावर सुरू होते. असं असतानाच त्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोषला मोठ्या बॅनरची कामे मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते. मुंबईतील मानसोपचार तज्ज्ञांचा सल्लाही त्याने घेतला होता. आशुतोष साडे चार वर्षांपासून मुंबईत राहत होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागील महिन्यात तो नांदेडला आपल्या आई-वडिलांकडे गेला.
गेल्या चार महिन्यांपासून कोणतंही काम नव्हतं. काही दिवसांपासून तो नैराश्यातच होता. या अनुषंगाने तो उपचारही घेत होता. मात्र त्याने या दरम्यान अचानक मृत्यूला कवटाळले.
लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकारांनी नैराश्यातून आत्महत्या केली. कलाकारांना काम न मिळणं ही गोष्ट अधिक मनाला लागते त्यामुळे असे प्रकार घडत आहेत. वोदित अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेडमध्ये त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 'भाकर' आणि 'इचार ठरला पक्का' सिनेमातून काम केलंय.
आशुतोष हा गेले काही दिवस तो तणावातून जात होता. काही दिवासांपुर्वी त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये लोकं आत्महत्या का करतात ? हा आशय होता. पण आशुतोष या निर्णयापर्यंत जाईल असा कोणी अंदाज लावला नव्हता.