तनुजा यांनी धर्मेंद्र यांच्या लागवली होती कानशिलात, Flirt केल्यामुळे बांधली राखी अन्...

When Tanuja Slapped Dharmendra : धर्मेंद्र आणि तनुजा (Tanuja on Dharmendra) यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. 70-80 च्या काळात हे दोघंही अत्यंत लोकप्रिय कलाकार होते. परंतु सेटवर असा एक प्रकार घडला होता ज्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. तुम्हाला माहितीये का की धर्मेंद्र यांच्या एका गैरवर्तनामुळे तनुजा यांनी चक्क त्यांच्या कानशिलात लगावली होती. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 26, 2023, 01:48 PM IST
तनुजा यांनी धर्मेंद्र यांच्या लागवली होती कानशिलात, Flirt केल्यामुळे बांधली राखी अन्...  title=
when tanuja slapped dharmendra and called besharam for flirting besides married latest entertainment trending news in marathi

When Tanuja Slapped Dharmendra : बॉलिवूडमध्ये अनेकदा सेलिब्रेटींच्या रिलेशनशिप्सची चर्चा असते. ही चर्चा काही आताची नाही तर ही अगदी 70-80 च्या दशकातही असायची. तेव्हाही अशा अनेक अभिनेत्री होत्या, अभिनेते होते त्यांच्या सौंदर्यावर अनेक चाहते फिदा होते. फक्त चाहतेच काय तर तेव्हा कुठल्या एका अभिनेत्रीच्या प्रेमात इतर अभिनेते किंवा एका अभिनेत्याच्या प्रेमात अभिनेत्रीही पडायच्या. तेव्हाही आतासारखं फर्ल्टिंग वैगेरे सगळंच होतं. याबद्दल एका ज्येष्ठ अभिनेत्रीनंही खुलासा केला होता. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा होती. या ज्येष्ठ अभिनेत्रीसोबत कशाप्रकारे एक ज्येष्ठ अभिनेता फर्ल्ट करत होता याबद्दल त्यांनी सांगितले होती. हा किस्सा बराच गाजला होता. आज या लेखातून आपण हाच किस्सा जाणून घेणार आहोत. 

आम्ही तुम्हाला सांगतोय अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल आणि या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत तनुजा. तनुजा या आजही तितक्याच एव्हरग्रीन आहेत. त्यांच्या दोन्ही मुलीही या क्षेत्रात सक्रिय आहेत. काजोल आणि तनिषा मुखर्जी याही लोकप्रिय अभिनेत्री आहेत. चला तर जाणून घेऊया की नक्की हा किस्सा आहे तरी काय? 

अभिनेत्री तनुजा या तेव्हाच्या फारच  लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांच्या सौंदर्यावर अनेक जणं फिदा होते. खुद्द मोठ मोठे अभिनेतेही त्यांच्यावर फिदा होते. धर्मेंद्रही त्यांच्यावर प्रचंड फिदा होते. त्यांनी 'फिल्मफेअर'च्या एका मुलाखतीतून धर्मेंद्र यांच्या एका वर्तनाबद्दल सांगितले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या फर्ल्टिंगबद्दल कमेंट केली होती. त्यांनी सांगितले होते की जेव्हा धर्मेंद्र हे त्यांच्यासोबत फर्ल्ट करत होते तेव्हाच त्यांनी जबरदस्ती त्यांना तिथल्या तिथे राखी बांधून घेतली आणि मग त्यांना स्वत:चा भाऊ करून घेतले.

तनुजा म्हणाल्या होत्या की, ''आम्ही 'दुलाल गुहा की चांद' आणि 'सूरज' या चित्रपटांच्या शुटिंगसाठी व्यस्त होतो. तेव्हा आम्ही म्हणजे मी आणि धर्मेंद्र खूप चांगले 'ड्रिकींग बडीज' होतो. आम्ही एकत्र खूप मज्जा मस्ती करायचो. त्यांनी मला त्यांच्या पत्नीला प्रकाश कौर यांना भेटवले होते. सनी देओल तेव्हा 5 वर्षांचा होता. त्यांची मुलगी लाली ही 6 महिन्यांची होती.'' 

''एक दिवशी त्यांनी तर माझ्यासोबत फर्ल्ट करायला सुरूवात केली. तेव्हा मी त्यांच्या कानशिलात लगावली आणि त्यांना म्हटलं, बेशरम, मला माहिती आहे की तुमची पत्नी आहे आणि तुम्ही माझ्यासोबत फर्ल्ट करताय? तुमची हिम्मत कशी झाली? तेव्हा त्यांनी मला सांगितले की, 'तनु,माझी आई, मी सॉरी म्हणतोय ना, मला तु तुझा भाऊ करून टाक' त्यानंतर मी त्यांना एक दोरा घेतला आणि त्यांना राखी बांधून माझा भाऊ बनून टाकलं.'', अशी आठवण त्यांनी सांगितली.