तिसऱ्यांदा 'खिचडी' अधिक स्वादिष्ट होणार

खिचडीचा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 24, 2017, 10:09 PM IST
 तिसऱ्यांदा 'खिचडी' अधिक स्वादिष्ट होणार title=

मुंबई : २००२ पासून घरातील प्रत्येकाच्या पसंतीस पडलेली खिचडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

खिचडीचा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये अनेक ओळखीचे चेहरेही पाहायला मिळणार आहेत. 

ही नावे फायनल 

या सिझनमध्ये असणाऱ्या काही कलाकारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत तर काहींच्या नावावर चर्चा सुरू आहे. रेणुका शहाणे, देबिना बॅनर्जी आणि बख्तियार इराणी ही नावे फायनल लिस्टमध्ये आहेत.  त्यात आता दिपशिखा नागपालचे नावही चर्चेत आहे.

लोकप्रिय चेहऱ्यांना संधी 

शोचे निर्माते जे. डी. माडिथिया यावेळी खिचडी अधिक स्वादिष्ट बनवू इच्छित आहे.  त्यामूळे त्यांनी  लोकप्रिय चेहऱ्यांना संधी दिली आहे.

'मॉर्डन डॉक्टर' 

दिपशिखा ही बा, बहू और बेबी मधून प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. 

खिचडीमध्ये ती एक मॉर्डन डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.