'खारी बिस्कीट' सिनेमाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. 

Updated: Aug 14, 2019, 04:04 PM IST
'खारी बिस्कीट' सिनेमाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : संजय जाधव दिग्दर्शित आणि झी स्टुडिओची निर्मिती असलेला 'खारी बिस्कीट' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात चिमुरड्या भावंडांची कथा पाहायला मिळणार आहे. कितीही गरिबी असली तरी तिच्या डोळ्यात कधीही पाणी आणू न देण्यासाठी, तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत झटणाऱ्या आणि तिला फुलासारखं जपणाऱ्या बिस्कीटची आणि त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या खारीची ही कथा आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमाच्या गाण्यातून देखील त्याचा प्रत्यय येतो. क्षितिज पटवर्धन यांचे शब्द आहेत. संगीतकार सुरज-धीरज या जोडीने संगीत दिले असून कुणाल गांजावाला यांनी स्वरबद्ध केलेले हे गाणं झी म्युझिकच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या सिनेमात बिस्कीटची भूमिका आदर्श कदमने केली आहे तर खारीची भूमिका वेदश्री खाडिलकरने साकारली आहे. सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या सिनेमात आहेत. 

झी स्टुडिओज आणि ड्रीमिंग ट्वेन्टी फॉर सेव्हन यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या २७ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.