दारुच्या नशेत टल्ली झाली अरबाजची पत्नी? शूरा खानचा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

सलमान खानचा भाऊ अरबाज खान सध्या खूप चर्चेत आहे. नुकतीच अरबाज खानने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. सध्या तो त्याच्या नव्या लग्नाचा आनंद घेत आहे. 24 डिसेंबर रोजी मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत अरबाजनने लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच अरबाज आणि शूरा त्यांच्या हनिमूनवरुन परतले आहेत. 

Updated: Jan 9, 2024, 03:14 PM IST
दारुच्या नशेत टल्ली झाली अरबाजची पत्नी? शूरा खानचा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण title=

मुंबई : सलमान खानचा भाऊ अरबाज खान सध्या खूप चर्चेत आहे. नुकतीच अरबाज खानने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. सध्या तो त्याच्या नव्या लग्नाचा आनंद घेत आहे. 24 डिसेंबर रोजी मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत अरबाजनने लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच अरबाज आणि शूरा त्यांच्या हनिमूनवरुन परतले आहेत. नुकतेच हे दोघं डिनर डेटचा आनंद लुटताना दिसले. ज्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यावर लोक खूप मजेदार कमेंट्स देखील करत आहेत. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. समोर आलेल्या व्हिडीओ पाहून अनेकांनी शूराला ट्रोलही करायला सुरुवात केली आहे.

नुकतेच अरबाज आणि शूरा बांद्राच्या प्रसिद्ध ऑलिव बार एंड रेस्टोरेंटमध्ये पोहचले होते. दोघांनी एकत्र डिनर केलं. नेहमीप्रमाणे जजे कपल रेस्टारंटच्या बाहेर येतं तसं पापाराझी त्यांना त्यांच्या कॅमेरामध्ये कैद करायला सुरुवात करतं. आता नवीन जोडपं लग्नानंतर पहिल्यांदा डिनर डेटवर गेल्यावर पापाराझी त्यांना त्याच्या कॅमेरात कैद केलं. दोघं रेस्टारंटमध्ये नुकतेच स्पॉट झाले. यानंतर पापाराझींनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली. यानंतर शूरा तिचा चेहरा लपवू लागली. यादरम्यान अरबाजने त्याच्या पत्नीचा हात धरला. आणि कारमध्ये जावून बसले. डिनर डेटसाठी शूरा आणि अरबाज दोघांनीही केशरी रंगाचे ट्विनिंग सेट परिधान केला होता. सध्या या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अरबाज-शूराच्या व्हायरल व्हिडिओवर नेटिझन्स विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत आणि आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं आहे की, ' त्याची पत्नी त्याच्या  मुलीसारखी दिसतेय.' तर अजून एकाने लिहिलं आहे की, 'कदाचित त्याच्या पायात काही प्रॉब्लेम आहे', तर अजून एका यूजरने कमेंट करत म्हटलं, 'खूप जास्त झाली आहे... चाल बघा.' तर अजून एकाने लिहींलय, नशेत आहेस का? तर अजून एकाने लिहिलंय, 'थोड़ा कम पीना था ना' तर अजून एकाने लिहीलंय, 'शर्मिली कन्या' तर अजून एकाने म्हटलंय, शूरा नशेत आहे का? तर अजून मलायकाच चांगली होती. अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते त्यांच्या या समोर आलेल्या व्हिडीओवर करत आहेत.