KBC : 'कौन बनेगा करोड़पती' (KBC 14) या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग चाहत्यांसाठी पर्वणी ठरतो. हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकापासून ते अगदी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत प्रत्येकजण बिग बींमार्फत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या हुशारीची परीक्षा घेत असतो.
हल्लीच प्रदर्शित करण्यात आलेल्या भागामध्ये केबीसीच्या हॉट सीटवर दिल्लीचा आयुष गर्ग बसलेला दिसला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत तो टप्प्याटप्प्यानं पुढे जात होता. अमृत प्रश्नाचं उत्तर देणारा तो पहिलाच स्पर्धक ठरला. कार्यक्रमात आयुष 75 लाख रुपयांची रक्कम तर जिंकला. पण, 1 कोटी रुपयांचं बक्षीस मात्र त्याला जिंकता आलं नाही. (KBC give the answer of 1 crore rupees question amitabh bachchan)
1 कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर त्याला गेता आलं नाही, पण या प्रश्नाचं उत्तर टेलिव्हिजनसमोर बसलेल्या काहींना मात्र अगदी सहजपणे जमलं. तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे का? पाहा तर मग तो 1 कोटींच्या पक्षीसाचा प्रश्न
प्रश्न- तो कोणता पर्वत होता, जिथं पहिल्यांदाच कोणा व्यक्तीनं 8 हजार मीटरहून जास्त उंच अंतराची चढाई केली होती?
पर्याय
A. अन्नपूर्णा
B. ल्होत्से
C. कंचनजंघा
D. मकालू
... आणि आयुष चुकला
आयुषनं या प्रश्नाचं उत्तर देताना धोका पत्करला आणि तो तिथंच फसला. त्यानं B. ल्होत्से हा पर्याय निवडला. पण, या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं A. अन्नपूर्णा. आयुषला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही आणि तो कोट्यधीश होता होता राहिला. पण, 75 लाख रुपयांचं बक्षीस मात्र तो इथून जिंकून गेला. शिवाय 1 कोटींच्या प्रश्नापर्यंत मजल मारणारा या पर्वातील तो पहिला स्पर्धक ठरला.