... आणि शिल्पा शेट्टीची झाली पोलखोल

'कौन बनेगा करोडपती-९' मध्ये जो कुणी हॉट सीटवर बसतो तो अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता असल्याचा दावा केला जातो. मात्र, असा दावा करणाऱ्या अभिनेत्रीची पोलखोल झाली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 1, 2017, 11:22 PM IST
... आणि शिल्पा शेट्टीची झाली पोलखोल  title=
File Photo

नवी दिल्ली : 'कौन बनेगा करोडपती-९' मध्ये जो कुणी हॉट सीटवर बसतो तो अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता असल्याचा दावा केला जातो. मात्र, असा दावा करणाऱ्या अभिनेत्रीची पोलखोल झाली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी केबीसीच्या सेटवर दाखल झाली. या शोमध्ये शिल्पा शेट्टीने दावा केला ती अभिनेता अमिताभ बच्चन यांची खूप मोठी चाहती आहे. मात्र, शिल्पा शेट्टीचं हे खोटं जास्त काळ टिकलं नाही आणि शिल्पाची पोलखोल झाल्याचं पहायला मिळालं.

शुक्रवारी 'नई चाह नई राह' एपिसोड येतो ज्यामध्ये सेलिब्रेटीसोबत एक सोशल वर्कर उपस्थित असतात. त्यानुसार अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल वर्करसोबत हॉट सिटवर पहायला मिळाली.

यावेळी अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातील गाणं ओळखण्यासाठी शिल्पाला सांगितलं. मात्र, शिल्पा शेट्टीला ते ओळखता आलं नाही आणि शिल्पाची पोलखोल झाली.