KBC: रामायणातील या प्रश्नाचे उत्तर देणं स्पर्धकाला झालं कठीण, तुम्हाला माहितीये का?

शोचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 21, 2022, 02:51 PM IST
KBC: रामायणातील या प्रश्नाचे उत्तर देणं स्पर्धकाला झालं कठीण, तुम्हाला माहितीये का? title=

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. ‘कौन बनेगा करोडपती’चे हे 14 वे पर्व सुरु आहे. शोमध्ये अमिताभ स्पर्धकांशी खूप गप्पा मारत खेळ पूर्ण करताना दिसतात. हा शो नेहमीच स्पर्धकांनी सांगितलेल्या त्यांच्या संघर्षाच्या गोष्टींमुळे आणि अमिताभ यांनी सांगितलेल्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. शोच्या नवीन एपिसोडची अमिताभ यांच्यासोबत गुजरातच्या लुनावडा येथून आलेल्या 47 वर्षीय ऋचा पुवार एका पारंपारिक पोशाखात दिसल्या. 

ऋचा पुवार या गृहिणी आहेत आणि शोमध्ये दिसणाऱ्या त्यांच्या गावातील पहिली व्यक्ती आहे. अमिताभ यांनी जेव्हा फास्टेस्ट फिंगर फर्स्ट खेळले तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला की QWERTY हा शब्द कोणाच्या लेआउटमध्ये वापरला आहे? स्क्रीन, कीबोर्ड, CPU आणि माऊस हे पर्याय होते. याला योग्य उत्तर देऊन ऋचा पुवार सीटवर बसल्या. मात्र, यावेळी ऋचा यांनी बिग बींच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तरही अचूक आणि पटकन दिले होते, त्यानंतर त्यांना ही संधी मिळाली.

आता यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यासमोर 12 लाख 50 हजारांचा प्रश्न मांडला. पण त्यांना उत्तर देता आले नाही आणि त्यांनी गेम न खेळण्याचा निर्णय घेतला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा कोणता प्रश्न होता ज्यावर ऋचा यांनी खेळ सोडला...
वाल्मिकी रामायणातील यापैकी कोणत्या कांडाचे नाव नाही? सुंदरकांड, वनवास कांड, युद्ध कांड आणि किष्किंध कांड हे ऑप्शन देण्यात आले होते. आता ऋचा यांना उत्तर देऊ शकल्या नाही. तर त्याचे उत्तर वनवास कांड आहे.