Urfi Javed ची अंडरगार्मेंट्स दाखवत हटके स्टाईल, डेनिम क्रॉप टॉप चर्चेत

याला फॅशन म्हणावं की अजून काही 

Updated: Sep 2, 2021, 08:11 AM IST
Urfi Javed ची अंडरगार्मेंट्स दाखवत हटके स्टाईल, डेनिम क्रॉप टॉप चर्चेत title=

 मुंबई : टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) नुकतीच एअरपोर्टवर वेगळ्याच आउटफिटमध्ये दिसली. तिच्या सुपरकूल डेनिम जॅकेटमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. क्रॉप टॉप असलेल्या डेनिम जॅकेटमुळे उर्फीची ब्रा पण दिसत होती. तिच्या या पिंक ब्रामुळे चांगलीच ट्रोल झाली आहे. स्टाइलचे कपडे कधी तुम्हाला धोका देतील हे सांगणं तसं कठीणच आहे. 

जॅकेटमुळे उर्फी झाली ट्रोल

विमानतळाबाहेर उर्वीचे हे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. पापाराझी विरल भयानीने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. एका युझरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, 'LOL तिच्या जॅकेटसाठी कापड कमी पडले.' त्याचप्रमाणे, दुसऱ्या युझरने म्हटलंय,'जॅकेटचा बाकीचा कपडा उंदराने कुरतडला वाटतं?

उर्फी चांगलीच झाली ट्रोल एका युझरने लिहिले, 'नवीन कपडे घ्या. कपडे लहान झाले आहेत. अगदी अंडरगार्मंट्सही दिसतात. त्याचप्रमाणे उर्फीला ट्रोल करताना दुसऱ्या युझरने लिहिले, 'ही कोणत्या प्रकारची फॅशन आहे?' दुसऱ्या युझरची कमेंट आहे की, 'हे लोक काहीही परिधान करतात.' उर्फी जावेद टीव्ही जगात एक अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि अनेक प्रसिद्ध शोचा भाग राहिली आहे.

या शोमध्ये दिसली उर्फी जावेद

उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे आणि रोज तिचे बोल्ड फोटो शेअर करत राहते. टीव्ही शोबद्दल बोलताना, उर्फी चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. याशिवाय, उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीचा भाग बनली पण 8 व्या दिवशी बेदखल झाली.