Kaun Banega Crorepati 15 : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे 'कौन बनेगा करोडपति 15' या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमाचे चाहते फक्त तरुण नाहीत तर त्यासोबत वृद्ध देखील आहेत. सगळ्यांना या कार्यक्रमात विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला माहित आहेत का हे जाणून घ्यायचे असते. या कार्यक्रमातून आपले फक्त मनोरंजन होत नाही तर त्यासोबतच आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आता पर्यंत या कार्यक्रमात हजारो लोक हॉटसीटवर बसले आहेत. त्यातले खूप कमी लोक त्यांच्या घरी मोठी रक्कम घेऊन जाऊ शकले आहेत. चला तर जाणून घेऊया नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडविषयी ज्यात एक स्पर्धक त्याच्या घरी फक्त 10 हजार रुपये घेऊन जाऊ शकली.
काल म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये हरियाणाच्या साक्षी सुनीता या हॉट सीटवर बसल्या होत्या आणि त्यांचे आई-वडील त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्यासोबत आले होते. साक्षी या 80 हजार रुपयाच्या प्रश्नावर हरल्या. खरंतर हा प्रश्न विचारण्या आधीच साक्षी यांनी दोन प्रश्नांसाठी त्यात एक बॉलिवूड गाण आणि दुसरं एका झाडाच्या नावाच्या प्रश्नासाठी दोन लाईफ लाइन वापरल्या. काही प्रश्नांनंतर साक्षी यांना आयसीसी मेन क्रिकेट विश्व कप 2023 वर आधारीत प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न 80 हजार रुपयांसाठी होता. तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचे उत्तर
ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चं अधिकृत गाणं कोणतं आहे?
A - दिल जश्न बोले
B- खेल जिंदगी का
C- कप हाय मंजिल
D- जीत कर मनाएंगे
या प्रश्नाचं योग्य उत्तर हे A आहे. मात्र, साक्षी यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं नाही. त्यांनी ऑप्शन D ची निवड केली होती. त्यामुळे त्यांना घरी 10 हजार रुपये घेऊन जावे लागले.
हेही वाचा : पहिल्याच दिवशी अक्षयच्या 'मिशन रानीगंज'ला धक्का, 10 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
दरम्यान, यंदाच्या सीझनमध्ये एका स्पर्धकानं 1 कोटी रुपये कमावले होते. या स्पर्धकाचं नाव जसकरन सिंह असे आहे. ते 7 कोटी रुपयाच्या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊ शकले नाही आणि त्यामुळे ते 1 कोटी रुपये घरी घेऊन गेले होते. पिंकव्हिलानं जसकरन यांना विचारलं की 'अमिताभ बच्चन यांनी त्यांना बॅकस्टेजला काही सल्ला दिला होता का? या प्रश्नावर उत्तर देत त्यांनी सांगितलं की खेळ संपल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मी बॅकस्टेज गेलो आणि तिथे आम्ही चर्चा केली आणि तेव्हा सर म्हणाले की मी चांगलं खेळलो आणि मला असंच खेळत रहायला हवं, असंच आयुष्यात चांगल करत रहा.'